पुणे, ३१ मे: क्रीडा क्षेत्रातील आपली घोडदौड चालू राखताना राजेश वाधवान समूह यांनी अल्टिमेट टेबल टेनिस लीग या पहिल्यावहिल्या टेबल टेनिस लीग स्पर्धेत पदार्पण केले असून त्यांच्या नव्या संघाचे नाव महाराष्ट्र युनायटेड टीम असे आहे.
फुटबॉल मधील एफसी पुणे सिटी नंतर राजेश वाधवान समूहाचा हा दुसरा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.
यावेळी बोलताना युटीटीचेचे मालक कार्तिक वाधवान म्हणाले की, आम्ही केवळ एक टेबल टेनिस संघ खरेदी केला नसून अल्टिमेट टेबल टेनिस लीगमधील गुंतवणूकदारांना एक सर्वोत्तम दर्जाचा संघ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या लीगच्या माध्यमातून देशभरातील सर्वोत्तम गुणवान टेबल टेनिसपटू एका स्पर्धेत एकत्र येतील आणि जगभरातील अव्वल खेळाडूंशी स्पर्धा करतील. भारतीय क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा आमचा प्रायत्न आहे.
अल्टिमेट टेबल टेनिस लीग हे ११ स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमीटेडची संकल्पना असून यामध्ये ६ फ्रँचायजीचा समावेश आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा सहभाग असणारा आहे.
महाराष्ट्र युनायटेडचे मुख्य अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, क्रीडा क्षेत्रात विविध स्तरावर नवे प्रकल्प उभारणे हे एक आमच्या या समूहाचे लक्ष आहे. एफसी पुणे सिटीद्वारे इंडियन सुपर लिगमधील संघ सर्वांना माहितीच आहे. आता अल्टिमेट टेबल टेनिस लीगच्या माध्यमातून या नव्या खेळातील योगदानही सर्वांना समजून येईल.देशांतील अनेक गुणवान टेबल टेनिसपटूंना सर्वप्रकारे साहाय्याची गरज आहे. महाराष्ट्र युनायटेड टीमच्या माध्यमातून आम्ही येत्या १० वर्षात भारताला टेबल टेनिसमध्ये ऑलंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओलंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्याचा आमचा सहभाग यशस्वी राहील.
महाराष्ट्र युनायटेड संघात चार मुले आणि चार महिला खेळाडूंचा समावेश असून दोन परदेशी आणि दोन भारतीय खेळाडू, तसेच एक आंतरराष्ट्रीय आणि एक भारतीय प्रशिक्षक यांचा प्रत्येक गटात समावेश असणार आहे. स्टार स्पोर्ट्स या लीगसाठी ऑफिशिअल ब्रॉडकास्टर असणार आहेत.