---Advertisement---

गेलनंतर अखेर एका खेळाडूने गाठला हा ऐतिहासिक टप्पा; सचिन-पाँटिंगलाही जमला नाही हा पराक्रम

On: शनिवार, जुलै 26, 2025 1:30 PM
Shai-Hope
---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवला होता. आता तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सलग सहावा विजय मिळवला आहे. ज्यामुळे आता ते 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून दोन स्फोटक शतके पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजकडून शे होपने विक्रमी शतक झळकावले तर ऑस्ट्रेलियाकडून टिम डेव्हिडने विक्रमी शतक झळकावले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोन्ही फलंदाजांनी 102-102 धावा केल्या. तथापि, टिम डेव्हिडची वादळी खेळी शे होपच्या शतकापेक्षा जास्त होती. लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिडने 37 चेंडूत 11 षटकार आणि 6 चौकारांसह 102 धावांची नाबाद खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

यापूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने शानदार सुरुवात केली. यादरम्यान, 31 वर्षीय सलामीवीर शाई होपने शानदार शतक ठोकले. शाई होपने 57 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 102 धावा केल्या. अशाप्रकारे, क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक ठोकणाऱ्या निवडक फलंदाजांच्या यादीत होपचा समावेश झाला. असा पराक्रम करणारा तो वेस्ट इंडिजचा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी, फक्त ख्रिस गेलनेच ही महान कामगिरी केली होती. आता शाई होपने गेलच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक ठोकणारा होप हा जगातील 27वा फलंदाज आहे. तिन्ही स्वरूपात शतक ठोकण्याचा पराक्रम करणारा शाई होप सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग सारख्या जगातील महान फलंदाजांना जे करता आले नाही. सचिन आणि पॉन्टिंग यांनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतके झळकावली पण टी-20 क्रिकेटमध्ये कधीही 100 धावांचा टप्पा गाठू शकले नाहीत.

वेस्ट इंडिजकडून क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक

ख्रिस गेल (11 सप्टेंबर 2007)
शे होप (25 जुलै 2025)

शे होपने यापूर्वी वेस्ट इंडिजसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत. होपने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. याच्या एक वर्षापूर्वीच त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. आता टी-20 मध्ये शतक झळकावताच त्याचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदले गेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---