नुकतेच इंग्लंडने पाकिस्तानला तिसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केले. इंग्लंडने या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. या पराभवामुळे पाकिस्तानला खूप मोठे नुकसान झाले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीतून पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. पाकिस्ताबरोबरच आणखी 5 संघ असे आहेत, जे या स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीत एकूण 9 संघ होते, ज्यापैकी दोनच संघाना अंतिम सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र अजुनही 4 संघ असे आहेत, जे अंतिम सामन्यात पोहोचू शकतात. यात दुसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ देखील समावेश आहे
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी 76.92 % इतकी आहे. या गुणतालिकेत भारतीय संघ 55.77 % या टक्केवारीसोबत दुसऱ्या स्थानावर आहेे. तसेच या तालिकेत तिसरा संघ दक्षिण आफ्रिकेेचा आहे. त्यांनी 55.77 % सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंका संघ चौथ्या क्रमांकावर आहे, जो की अजूनही अंतिम सामन्याच्या शर्यतीत आहे.
जर जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर जाणाऱ्या संघांविषयी बोलायचे झाले तर, पाकिस्तान संघाचे नाव सध्या ताजे आहे. परंतू, या संघाकडे अजूनही टॉप-2मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. मात्र, पाकिस्तानला स्वत:च्या सामन्यांमध्ये विजय मिळवण्यापेक्षा दुसऱ्या संघाच्या निकालावर जास्त अवलंबून राहावे लागणार आहे. कसोटी सामन्यात याची शक्यता नाही. तसेच इंग्लंडच्या खात्यात 46.97% गुण आहेेत, पण इंग्लंडचा संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकणार नाही, कारण इंग्लंडने या स्पर्धेचे सर्व सामने खेळले आहेत. याशिवाय वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आणि बांगलादेशचा संघ देखील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
पाकिस्तानचा संघ या मालिकेच्या आधी चौथ्या स्थानावर होता. मात्र आता पाकिस्तान संघ 38.89% गुणांसोबत सातव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तान संघाला अजूनही दोन कसोटी सामन्यांची मालिका आपल्या मैदानावर खेळायची आहे. मात्र, पाकिस्तानने ही मालिका 2-0ने जरी जिंकली तरी ते अंतिम-2 मध्ये प्रवेश करु शकणार नाही. यामुळे पाकिस्तान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, त्याची लायकी तरी आहे का? विराटशी त्याची तुलना नकोच म्हणत बाबरवर भडकला पाकिस्तानी दिग्गज
धोनीच्या सहीशेजारी ऑटोग्राफ देण्यास ईशान किशनचा नकार, चाहत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल