इंग्लड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमधील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार होता. परंतु भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे ही मालिका रद्द करण्यात आली आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर होता. दरम्यान काही भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. ज्यामुळे ईसीबीने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मालिका रद्द करण्यात आल्यामुळे बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
माध्यमांतील वृत्तानुसार, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि संघातील काही खेळाडू आपल्या कुटुंबासह प्रवास करत आहे. त्यामुळे या खेळाडूंनी अंतिम कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. ज्यामुळे ईसीबीने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ईसीबीने म्हटले की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत पार पडलेल्या चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, मँचेस्टरमध्ये पार पडणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय खेळाडू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भयभीत झाले होते. ज्यामुळे भारतीय संघाकडे ११ खेळाडू देखील नव्हते. याच कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आला आहे.”
तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डने क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही आमच्या क्रिकेट चाहत्यांची आणि न्यूज पार्टनरची माफी मागतो. आमच्यामुळे तुमची गैरसोय झाली आहे. या प्रकरणाबाबत लवकरच अधिक माहिती दिली जाईल.”
बीसीसीआयचे होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान
ईसीबीला अशी आशा होती की, अंतिम कसोटी सामन्यादरम्यान २१ हजार क्षमता असलेल्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर एकही खुर्ची रिकामी राहणार नाही. पण आता सामना रद्द झाल्यानंतर तिकिटांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ब्रॉडकास्टिंग रिवेन्यूमध्ये देखील ३०४ कोटींचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईसीबीने बीसीसीआयला म्हटले आहे की, झाले नुकसानाची भरपाई बीसीसीआयकडून केली जाणार आहे.
तर दुसरीकडे बीसीसीआयने देखील ईसीबीवर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयचे असे म्हणणे आहे की, जेव्हा बीसीसीआयने गुरुवारी (९ सप्टेंबर) कसोटी सामना रद्द करण्यास सांगितले होते. त्यावेळी मालिका २-२ च्या बरोबरीत संपली असती. या व्यतिरिक्त खेळाडूंना ओल्ड ट्रॅफर्डमध्ये जावे लागले नसते.
महत्त्वाच्या बातम्या-
रद्द झालेला इंग्लंड वि. भारत पाचवा कसोटी सामना होणार रिशेड्यूल, पण कधी आणि कोठे होईल मॅच?





