भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 मधील चौथा सामना बुधवारी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी खेळला. भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागली. टी-20 विश्वचषक सुरू झाल्यापासून विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना नाबाद 64 धावा कुटल्या आणि खास विक्रमाची नोंद देखील केली. सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग हे क्रिकेटविश्वातील महान फलंदाज आहेत. आता विराट या दिग्गजांच्या यादीत सहभागी झाला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वैयक्तिक अर्धशतके केली. राहुल टी-20 विश्वचषकाच्या चालू हंगामात पहिल्या तीन सामन्यांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला होता. अशात बांगलादेशविरुद्धचे अर्धशतक त्याच्यासाठी अधिकच महत्वाचे ठरले. विराट कोहीलने मात्र विश्वचषक सुरू झाल्यापासून तिसरे अर्धशतक केले. विराटने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळताना नाबाद 82 आणि नाबाद 62 धावा केल्या होत्या. अशातच आता त्याने बांगलादेशविरुद्ध 64 धावांची नाबाद खेली केली आणि दिग्गजांच्या यादीत सहभागी देखील झाला.
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. सचिनचे अनेक विक्रम असेही आहेत, जे आजही अबाधित आहेत. असाच एक विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 धावांपेक्षा मोठी खेळी करण्याचा. सिचनच्या नावावर सर्वाधिक 264 वेळा 50 धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. सचिन या यादीत पहिल्या क्रमांकावर टिकून आहे. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा मोठी खेळी करणारा पाचवा फलंदाज बनला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये सर्वाधिक 5०+ धावा करणारे फलंदाज –
यादीत दुसऱ्या क्रमांकावर 217 अर्धशतकांसह रिकी पॉंटिंग आहे. तिसरा क्रमांक श्रीलंकन दिग्गज कुमार संगकाराचा आहे, ज्याने 216 अर्धशतके केली आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलीस आहे. कॅलिसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 211 अर्धशतके केली आहेत. विराट कोहली 119 अर्धशतकांसह या यादीत नव्याने सहभागी झाला आहे.
यादी –
264 – सचिन तेंडुलकर
217 – रिकी पॉंटिंग
216 – कुमार संगकारा
211 – जॅक कॅलिस
199 – विराट कोहली
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाचा सम्राट बनला ‘किंग कोहली’! लाजवाब खेळीत रचला नवा विश्वविक्रम
राहुलने वाढदिवसापूर्वीच गर्लफ्रेंडला दिले खास गिफ्ट, झळकावली 2022 टी20 विश्वचषकातील पहिली फिफ्टी