इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ हंगामाचा अंतिम सामना रविवारी (३१ मे) खेळला गेला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. तब्बल दोन महिने चाललेल्या या स्पर्धेचा शेवट आरसीबीच्या विजयाने झाला. आता यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने सुरू होणार असल्याने भारतीय पुरुष संघाचे पुढील १२ महिने खूपच व्यस्त असणार आहेत.
भारताला मार्च २०२७ पर्यंत सुमारे १० कसोटी, २० पेक्षा अधिक वनडे आणि टी२० सामने खेळायचे आहेत. आयपीएलच्या थरारनंतर ६ दिवसांतच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त होईल. याची सुरूवात मायदेशातील अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेने होणार आहे, ज्यामध्ये एक कसोटी आणि तीन वनडे सामने खेळले जातील. कसोटी सामना ६ जूनपासून खेळला जाणार असून हा सामना WTC स्पर्धेचा भाग नाही, मात्र पुढील कसोटी सामने महत्त्वाचे असणार आहेत. तसेच त्या एकमात्र कसोटीनंतर वनडे मालिका सुरू होणार असून त्यातील पहिला सामना १३ जूनला खेळला जाणार आहे.
जून महिन्याच्या अखेरीस भारत आयर्लंडमध्ये दोन टी२० सामने खेळले, त्यानंतर जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे पाच टी२० आणि तीन वनडे सामने खेळले जातील. त्याच महिन्यात झिम्बाब्वेमध्ये तीन टी२० सामने खेळतील. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत सहभागी होईल. तसेच भारताला झिम्बाब्वेबरोबर श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड दौऱ्यावरही जायचे आहे.
भारतीय वरिष्ट पुरुष संघाचे मार्च २०२७ पर्यंतचे वेळापत्रक
अफगाणिस्तानचा भारत दौरा
६ ते १० जून – एकमात्र कसोटी, मुल्लणपूर
वनडे मालिका
१३ जून – पहिला वनडे सामना, धरमशाला
१७ जून – दुसरा वनडे सामना, लखनऊ
२० जून – तिसरा वनडे सामना, चेन्नई
भारताचा आयर्लंड दौरा (टी२० मालिका) २०२६
२६ जून – पहिला टी२० सामना, बेलफास्ट
२८ जून – दुसरा टी२० सामना, बेलफास्ट
भारताचा इंग्लंड दौरा २०२६
टी २० मालिका
१ जुलै – पहिला टी२० सामना, चेस्टर-ल-स्ट्रीट
४ जुलै – दुसरा टी२० सामना, मँटेस्टर
७ जुलै – तिसरा टी२० सामना, नॉटिंगघम
९ जुलै – चौथा टी२० सामना, ब्रिस्टोल
११ जुलै – पाचवा टी२० सामना, साऊथॅम्पटन
वनडे मालिका
१४ जुलै – पहिला वनडे सामना, बर्मिंगघम
१६ जुलै – दुसरा वनडे सामना, कार्डिफ
१९ जुलै – तिसरा वनडे सामना, लॉर्ड्स
भारताचा झिम्बाब्वे दौरा २०२६
२३ जुलै २०२६ – पहिला टी२० सामना, हरारे
२५ जुलै २०२६ – दुसरा टी२० सामना, हरारे
२६ जुलै २०२६ – तिसरा टी२० सामना, हरारे
भारताचा श्रीलंका दौरा २०२६
२०२५-२७ जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग म्हणून भारत ऑगस्टमध्ये श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळणार आहेत, मात्र अद्याप याच्या तारखा निश्चित झालेल्या नाही.
भारताचा बांगलादेश दौरा
या दौऱ्यात ३ वनडे आणि तेवढेच टी२० सामने खेळले जाणार असून या मालिका कदाचित सप्टेंबरमध्ये खेळल्या जाईल. सध्यातही याबद्दल तारिख निश्चित नसून या मालिका खेळल्या जाणार की नाही हे पण निश्चितपणे सांगता येत नाही
१९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत (एशियन गेम्स) क्रिकेटचे सामने खेळले जाणार असल्याने भारत यामध्ये व्यस्त असणार आहे.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा २०२६
वनडे मालिका
२७ सप्टेंबर – पहिला वनडे सामना , तिरुअनंतपुरम
३० सप्टेंबर – दुसरा वनडे सामना , गुवाहाटी
३ ऑक्टोबर – तिसरा वनडे सामना , मुल्लणपूर
टी२० मालिका
६ ऑक्टोबर – पहिला टी२० सामना, लखनौ
९ ऑक्टोबर – दुसरा टी२० सामना, रांची
११ ऑक्टोबर – तिसरा टी२० सामना, इंदोर
१४ ऑक्टोबर – चौथा टी२० सामना, हैदराबाद
१७ ऑक्टोबर – पाचवा टी२० सामना, बंगळुरू
भारताचा न्यूझीलंड दौरा २०२६
या दौऱ्यात २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले जाणार असून हे सामने ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीत खेळले जाण्याची शक्यता आहे. याचे अद्याप अचूक वेळापत्रक निश्चित झालेले नाही.
श्रीलंकेचा भारत दौरा २०२६
वनडे मालिका
१३ डिसेंबर – पहिला वनडे सामना , दिल्ली
१६ डिसेंबर – दुसरा वनडे सामना , बंगळुरू
१९ डिसेंबर – तिसरा वनडे सामना, अहमदाबाद
टी२० मालिका
२२ डिसेंबर – पहिला टी२० सामना, राजकोट
२४ डिसेंबर – दुसरा टी२० सामना, कटक
२७ डिसेंबर – तिसरा टी२० सामना, पुणे
झिम्बाब्वेचा भारत दौरा २०२७
यामध्ये तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत.
३ जानेवारी – पहिला वनडे सामना , कोलकाता
६ जानेवारी – दुसरा वनडे सामना , हैदराबाद
९ जानेवारी – तिसरा वनडे सामना, मुंबई
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा २०२७
२१ ते २५ जानेवारी – पहिली कसोटी, नागपूर
२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी – दुसरी कसोटी, चेन्नई
११ ते १५ फेब्रुवारी – तिसरी कसोटी, गुवाहाटी
१९ ते २३ फेब्रुवारी – चौथी कसोटी, रांची
२७ फेब्रुवारी ते ३ मार्च – पाचवी कसोटी, अहमदाबाद
नुकतीच माहिती समोर येत आहे की सप्टेंबर महिन्यात दिल्लीमध्ये अफगाणिस्तान भारताविरुद्ध तीन टी२० सामन्याच्या मालिकेचे यजमानपद भुषवणार आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर केलेली नाही.






