भारतीय संघ सिडनीत झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला आहे. आता भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज मयंक अगरवालला सराव सत्रात फलंदाजी करताना दुखापत झाली आहे. त्याचे स्कॅनिंग झाले आहे. मात्र त्याचा अहवाल येणे बाकी आहे, असे वृत्त आता समोर येत आहे. त्यामुळे तो चौथा कसोटी सामना खेळू शकेल का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर येण्यापूर्वी पासून भारतीय संघातील खेळाडूंना दुखापत होण्याचे सत्र चालू आहे. आतापर्यंत भारतीय संघातील 9 खेळाडूंना दुखापत झाली. स्पोर्ट्स टुडेच्या माहितीनुसार चौथ्या कसोटी सामन्यासाठी हनुमा विहारी याच्या जागी मयंक अगरवाल याला संधी देण्याची शक्यता होती. परंतु सराव सत्रात फलंदाजी करताना मयंक अगरवालला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे स्कॅनिंग केले आहे. मात्र याचा अहवाल हाती येणे बाकी आहे.
भारतीय संघाच्या मॅनेजमेंटला आशा आहे की, मयंक अगरवाला फ्रॅक्चर झालेले नसावे. परंतु या दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कोणती असणार या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मयंकच्या दुखापतीमुळे भारतीय संघापुढे चौथ्या कसोटी सामन्यासाठी पेच निर्माण झाला आहे.
सध्या भारतीय संघातील गोलंदाजी विभागातील सर्व वरीष्ठ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्याचबरोबर फलंदाजी विभागात सुद्धा दुखापती खेळाडूंची संख्या कमी नाही. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा, केएल राहुल यांना दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आहे. तसेच तिसऱ्या कसोटीदरम्यान हनुमा विहारीही हॅमस्ट्रिंगमुळे त्रस्त होता. तर तिसऱ्या सामन्यानंतर असेही वृत्त समोर आले होते की जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण आल्याने तो देखील चौथ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघासमोर चौथ्या कसोटीसाठी मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रविंद्र जडेजा म्हणाला, ‘मी लवकरच…’
टेस्ट रँकिंगमध्ये चमकला ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या, तर भारतीय गोलंदाजांची घसरण