इंग्लंड संघ संध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. इंग्लंडला या दौऱ्यात वेस्ट इंडीजसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना अँटिग्वा स्थित सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामना ८ मार्चला सुरू झाला आणि पहिल्या डावात इंग्लंडसाठी जॉनी बेयरस्टो (१४०) एकमेव खेळाडू ठरला, ज्याने शतकी खेळी केली. त्याच्या महत्वाच्या खेळीनंतर भारतीय दिग्गज इरफान पठाण याने महत्वाचा प्रश्न उपस्थित करत एकप्रकारे इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंची फिरकी घेतली आहे.
पहिल्या दिवशी इंग्लंड फलंदाजीसाठी आल्यानंतर वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी त्यांच्यावर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केल्याचे दिसले. केमार रोच, जेसन होल्डर आणि जेयडेन सेल्स यांनी इंग्लंडच्या वरच्या फळीला पूर्णपणे उध्वस्त केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिका खेळतानाही इंग्लंड संघाचे प्रदर्शन निराशाजनक राहिले होते. यानंतर इंग्लंजच्या माजी दिग्गजांपैकी अनेकांनी संघातील खेळाडूंवर निशाणा साधला होता. यावेळी दिग्गजांनी खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाविषयीही नाराजी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर आता भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) याने महत्वाच्या मुद्याला हात घातला आहे. इरफानने ट्वीट करून प्रश्न विचारला की, “जॉनी बेयरस्टो आयपीएल खेळतो का ?” इरफानच्या मते इंग्लिश दिग्गजांनी काही दिवसापूर्वी खेळाडूंच्या आयपीएल सहभागावर उपस्थित केलेले प्रश्न योग्य नव्हते. कारण बेयरस्टो आयपीएमध्येही खेळतो आणि स्वतःच्या देशासाठीही त्याने चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. दरम्यान, जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यापूर्वी आयपीएमध्ये सनरायझर्स हैदराबादचा महत्वाचा खेळाडू होता. आगामी हंगामात तो पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
https://twitter.com/IrfanPathan/status/1501503600086106113?s=20&t=_dEJqv39PdHg_SZPdGyqqg
डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ महिन्यात पार पडलेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा लाजिरवाणा पराभव केला होता. मालिकेत पहिले तीन आणि शेवटच्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला होता, तर चौथा सामना इंग्लंडने कसाबसा अनिर्णीत केला होता. चौथा सामना अनिर्णीत झाल्यामुळे इंग्लंड संघ क्लीन स्वीप मिळण्यापासून वाचला.
इंग्लंड संघाच्या या खराब प्रदर्शनानंतर संघाचे माजी दिग्गज खेळाडू आणि जाणकारांनीही खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मते खेळाडू संघासाठी चांगले प्रदर्शन करण्यापेक्षा आयपीएलला अधिक महत्व देतात आणि याच गोष्टीचा परिणाम संघाच्या कसोटी प्रदर्शनावर दिसला. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी यावर्षी आयपीएमधून माघार घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
PHOTOS: राजस्थान रॉयल्सने नव्या रंगात नव्या ढंगात केली सरावाला सुरूवात
इंग्लंडचा ७ विकेट्सने धुव्वा उडवत वेस्ट इंडिजने भारताला केले टेकओव्हर, गुणतालिकेत ‘या’ स्थानी कब्जा
महिला विश्वचषकात ‘मिताली सेना’ भिडणार यजमान न्यूझीलंडशी; अव्वल स्थानाचे असेल लक्ष






