वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाला 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. संघाने पुढचे 2 सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. मात्र, शेवटचा सामना यजमानांनी 8 विकेटने जिंकून मालिका ताब्यात घेतली. या टी20 मालिकेत भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला.
शुभमन गिल (Shubman Gill) भातीय संघाच्या तीन्ही प्रकारात सलामवीरची भूमिक निभवत आहे. मात्र, त्याचा वेस्टइंडिज दौरा खूपच निराशाजनक ठरला. त्याची या दौऱ्यावरची कामगिरी खूपच खराब होती. शुभमनने पाच टी20 सामन्यात फक्त एकदाच 10 धावांचा आकडा पार केला.
पाचव्या टी20 सामन्यात केवळ 9 धावा करून गिल तंबूत परतला. तर पहिल्या तीन टी20 सामन्यात 3, 7 आणि 6 धावा करून तो बाद झाला. या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात गिलने 77 धावांची खेळी केली. पण तो बाकीच्या चार सामन्यात पुर्णपने अपयशी ठरला. द्विपक्षीय टी20 मालिकेत शुभमन गिल आता सर्वाधिक वेळा एकाच अंकात तंबूत परतण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आला आहे. याआधी हा विक्रम केएल राहुल (KL Rahul) च्या नावावर होता. तो 2021 साली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन वेळा एकेरी धावसंख्या करुन परतला होता. या टी20 मालिकेत केवळ तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव आणि कुलदीप यांचे प्रदर्शन चांगले होते.
आशिया चषकातील गिलच्या फॉर्मवर सर्वांचे लक्ष लागले आहे
शुभमन गिल आता आगामी आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतील त्याच्या फॉर्ममुळे संघाची चिंता नक्कीच वाढली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गिलने जबरदस्त फॉर्म दाखवला होता. अशा परिस्थितीत वनडे विश्वचषकापूर्वी तो परत फॉर्ममध्ये परतेल अशी आशा सर्वांनाच आहे. (after kl rahul shubman gill at number 1 in most single digit dismissals by indian player in t20i series)
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज
हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियावर नामुष्की! मोडली धोनी-विराट-रोहितची गौरवशाली परंपरा