भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात बांगलादेश संघाने अवघ्या एका विकटने बाजी मारली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी देखील घेतली. या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. प्रत्युत्तरात गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, पण क्षेत्ररक्षण मात्र सुमार झाले. याच पार्श्वभूमीवर दिग्गज दिनेश कार्तिक याची प्रतिक्रिया समोर येत आहे.
भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. नेहमी सलामीवा येणारा केएल राहुल (KL Rahul) या सामन्यात मध्यक्रमात खेळला आणि 73 धावांची सर्वात मोठी खेळी केली. राहुलव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. याच कारणास्तव भारताला अवघ्या 186 धावांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी, संघाने कसलेली गोलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. बांगलादेशने 40 व्या षटकात त्यांची 9 वी विकेट गमावली होती. मात्र, शेवटच्या जोडीने त्यांना विजय मिळवून दिला. डावाच्या 43 व्या षटकात केएल राहुल आणि वॉशिंगटन सुंदर यांनी सामना जिंकण्याच्या दोन संधी गमावल्या. या दोघांनीही सोपा झेल सोडल्याने भारताला सामना गमवावा लागला.
केएल राहुल आणि वॉशिंगटन सुंदरविषयी दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया
याच पार्श्वभूमीवर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला की, “स्पष्ट आहे केएल राहुल पडल्यामुळे झेल सुटला आणि वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) झेल घेण्यासाठी पुढे गेलाच नाही. तो कशामुळे आतमध्ये आला नाही, हे सांगता येणार नाही. पण जर त्याने चेंडू पाहिला असेल, तर तो पुढे गेला पाहिजे होता. या प्रश्नाचे उत्तर केवळ तो एकटाच देऊ शकतो. एकंदरीत पाहता क्षेत्ररक्षणाचा प्रभाव 50-50 टक्के राहिला. दिवस सर्वात चांगला नसला, तरी सर्वात वाईट देखील म्हणता येणार नाही. मला असे वाटते की, शेवटी दबावाच्या परिस्थितीत आपण काही चौकार देखील सोडले.”
बांगलादेशसाठी या खेळाडूंचे जबरदस्त प्रदर्शन
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर बांगलादेशसाठी शाकिब अल हसन आणि इबादत हुसैन यांनी जबरदस्त प्रदर्शन केले. या दोघांनी अनुक्रमे 5 आणि 4 विकेट्स घेत भारतीय संघाला स्वस्तात गुंडाळले. फलंदाजी विभागात बांगलादेशसाठी मेहदी सहन याने 39 चेंडूत 38 धावा घेतल्या आणि संघाला जिंकवण्यासाठी शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन
पराभवाचे खापर फलंदाजांच्या माधी! वाचा केएल राहुलविषयी काय बोलला कर्णधार रोहित शर्मा