पार्ल। भारताला शुक्रवारी (२१ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बोलंड पार्क येथे झालेल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील हा दुसरा सामना होता. भारताने पहिला सामना देखील ३१ धावांनी गमावला होता. त्यामुळे यजमान दक्षिण आफ्रिकेने या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघावर कसोटी पाठोपाठ वनडे मालिकाही गमावण्याची नामुष्की ओढावली.
आशिया खंडाबाहेर भारताचा सलग तिसरा पराभव
भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील (South Africa vs India ODI Series) पराभव आशिया खंडाबाहेरील सलग तिसरा वनडे मालिका पराभव ठरला आहे. भारताने आशिया खंडाबाहेर दक्षिण आफ्रिकेच्या आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळल्या. २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारताला ३-० असा पराभव स्विकारावा लागला होता. तर, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२० मध्येच २-१ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्त्व विराट कोहलीने केले होते. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलने भारताचे नेतृत्त्व केले. खरंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटकडून भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण, दौऱ्याला येण्यापूर्वी त्याला दुखापत झाली. त्यामुळे केएल राहुलकडे प्रभारी कर्णधारपद देण्यात आले.
याशिवाय भारताच्या भारताबाहेरील गेल्या ४ वनडे मालिकांबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत जरी पराभव झाला असला, तर भारताने २०२१ मध्ये श्रीलंकेत शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली २-१ अशा फरकाने वनडे मालिका जिंकली आहे.
India’s last three bilateral ODI series outside Asia:
Lost v South Africa, 2021/22*
Lost v Australia, 2020/21
Lost v New Zealand, 2019/20#INDvsSA— Umang Pabari (@UPStatsman) January 21, 2022
शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंत (८५) आणि केएल राहुल (५५) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ६ बाद २८७ धावा केल्या. भारतासाठी शार्दुल ठाकूरने तळात फलंदाजी करताना ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताने दिलेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने ४८.१ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून जानेमन मलानने ९१ आणि क्विंटन डीकॉकने ७८ धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजय मिळवणे सोपे झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई-पुणे भूषवणार आयपीएल २०२२ चे यजमानपद? ‘या’ दिवशी होऊ शकतो शुभारंभ
दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणे भारतासाठी दुर्मिळच! आत्तापर्यंत गमावल्यात ‘एवढ्या’ वनडे मालिका
ना गोलंदाजीत, ना फलंदाजीत कमाल! द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताच्या पराभवाची ४ मुख्य कारणे
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी