---Advertisement---

तुम्ही वानखेडेवर टीम इंडियाचा विजयोत्सव प्रत्यक्ष पाहू शकता का? पाहा काय आहे प्रोसेस

On: गुरूवार, जुलै 4, 2024 12:03 PM
---Advertisement---

चॅम्पियन संघ टी20 विश्वचषकासह आज (4 जुलै) सकाळी 6 वाजता मायदेशी परतला आहे. भारतीय संघ विमानतळावर उतरताच भारतीय चाहते आनंदाने उड्या मारत संघाते स्वागत  करत होते. टीम इंडिया सकाळी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर विजयी परेड साठी मुंबईकडे रवाना होणार आहे. या दरम्यान चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

वृत्त अहवलानुसार विजयी परेड नंतर वानखेडेवर भारतीय संघाच्या या सादरीकरणात पारितोषिक वितरण होणार आहे. यासाठी चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर मोफत प्रवेश मिळणार आहे.

नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला पोहोचेल. टीम इंडिया मुंबईत संध्याकाळी 5 वाजता खुल्या बसमध्ये विजयी परेड काढणार आहे. या परेडनंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचेल, जिथे सादरीकरण सोहळा होईल. या समारंभात रोहित शर्मा विश्वचषक ट्रॉफी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे ही ट्रॉफी बीसीसीआयच्या मुख्यालयात राहील. या सादरीकरणात पारितोषिक वितरण होणार आहे. तर या ऐतिहासिक सोहळ पाहण्यासाठी बीसीसीआयने सर्वासाठी मोफत प्रवेश ठेवले आहे.

टीम इंडिया चॅम्पियन झाल्यानंतर जय शाहने 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. मेन इन ब्लूच्या विजयानंतर, जय शाहने या चमकदार कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन लिहिले होते. तत्तपूर्वी टीम इंडिया एअरपोर्टवरून आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचली, जिथे त्यांनी एक खास केक कापला. टीम इंडियासाठी हॉटेलकडून खास केक बनवण्यात आला होता. टीम इंडिया भारतात परतण्यापूर्वीच सर्व काही आखले गेले होते.

महत्वाच्या बातम्या-

तो क्षण जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला होता, कपिल देव यांच्या नेतृत्वात केले होते विक्रम
“ही भावना शब्दात…” दिल्लीत उतरल्यानंतर चॅम्पियन्सने दिली पहिली प्रतिक्रिया
रोहितचा हिट अंदाज; ट्राॅफी उंचावताच चाहत्यांच्या आनंद गगनात, पाहा VIDEO

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---