भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. वनडे मालिका गमावल्यानंतर संघ कसोटी मालिका नावावर करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे. गुरुवारी (15 डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास आणि भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद रिजवान यांच्यातील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळाला. या दोघांतील वादात दिग्गज विराट कोहली याने देखील संधी साधत लिटन दास स्लेज केले.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 404 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाचे फलंदाज झटपट विकेट्स गमावताना दिसले. बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास (Litton Das) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांच्यात लाईव्ह सामन्यादरम्यान वातावरण तापल्याचे दिसले. बांगलादेशच्या डावातील 14 व्या षटकात हा प्रकार घडला, जेव्हा मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता आणि स्ट्राईकवर लिटन दास होता.
षटकातील पहिल्याच चेंडूवर सिराज आणि लिटन यांच्यात हा प्रकार घडला. हा चेंडू लिटनने खेळून काढला तेव्हा सिराज हलक्या आवाजात काहीतरी बोलला. लिटनला हीच गोष्ट खटकली आणि त्याने काणाला हात लावत बोललेले ऐकू आले नाही, असा इशारा केला. त्याने पंचांना देखील सिराज काय म्हणाला याविषयी विचारणा केली. या प्रकारानंतर पुढच्याच चेंडूवर सिराजने लिटनला क्लीन बोल्ड केले आणि चोख प्रत्युत्तर देखील दिले. सिराजने मैदानात लिटनसोबत केलेली स्लेजिंक कामी आली आणि विराट कोहली (Virat Kohli) देखील या विकेटनंतर आनंदात दिसला. विकेट मिळाल्यानंतर विराटने देखील अगदी त्याच पद्धतीने कानाला हात लावला, जसा आदल्या चेंडूवर लिटनने लावला होता. विराटचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आणि व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Test cricket is special with Virat Kohli. What a moment! pic.twitter.com/QM8isNqUl9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 15, 2022
Action – reaction. pic.twitter.com/VVPJlIHNqa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 15, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेसने 133 धावांवर 8 विकेट्स गमावल्या. भारतासाठी फिरकीपटू कुलदीप यादने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 3 विकेट्स नावावर केल्या. वेगवान गोलंदाज उमेश यादव देखील पहिल्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे आणि त्याने दुसऱ्या दिवशी 1 विकेट मिळवली. (After Mohammad Siraj bowled Liton Das, Virat Kohli also took the chance of sledging)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आगामी वनडे विश्वचषकात कुलदीपने का खेळले पाहिजे? ‘ही’ आहेत तीन कारणे
मोठी बातमी! भारतीय दिग्गजाने ‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, बोर्डाने दिली माहिती