न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रावळपिंडीच्या मैदानावर वनडे मालिका पार पडणार होती. परंतु, वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने सुरक्षेच्या कारणास्तव ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अनेक पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आणि दिग्गज खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड नंतर आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड क्रिकेट बोर्डने देखील पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा महिला आणि पुरुष संघ येत्या ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर रवाना होणार होता. परंतु, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने देखील सुरक्षेच्या कारणास्तव हा संपूर्ण दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहे.
"We can confirm that the Board has reluctantly decided to withdraw both teams from the October trip."
🇵🇰 #PAKvENG 🏴
— England Cricket (@englandcricket) September 20, 2021
इंग्लंडच्या महिला आणि पुरुष संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध वनडे आणि टी -२० सामन्यांची मालिका खेळायची होती. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पुरुष संघांमध्ये १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी टी -२० सामने पार पडणार होते. या मालिकेला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी सराव मालिका म्हणून देखील पाहिले जात होते. तर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान महिला संघांमध्ये १७, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार होती.(After New Zealand now England also cancelled it’s tour of Pakistan)
England have withdrawn from their men’s and women’s tour of Pakistan.
Details 👇
— ICC (@ICC) September 20, 2021
याबाबत स्पष्टीकरण देत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने म्हटले की, “आमच्या खेळाडूंचे आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे आणि सध्या आपण जगत आहोत त्या काळात हे अधिक महत्त्वाचं आहे. यामुळे टी२० विश्वचषकासाठी आमच्या पुरुष संघात अधिक गुंतागुंत निर्माण झाली असती. आम्हाला असे वाटते की, अशा परिस्थितीत पाकिस्तानचा दौरा करणे टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने योग्य नसेल. विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणे, हे आमच्यासाठी प्राथमिक आव्हान असणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘मिस्टर ३६०’ च्या नावे नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ गोलंदाजांनी डिविलियर्सला केलंय ‘गोल्डन डक’वर बाद
अरं काय रे हे आरसीबी! तब्बल ‘इतक्यांदा’ ओढवलीय १०० पेक्षा कमी धावांत बाद होण्याची नामुष्की
बापरे!! ‘इतक्या’ कोटींना विकली जाणार विराट कोहलीची ‘सुपर कार’; किंमत वाचून व्हाल चकीत