आगामी टी२० विश्वचषक ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकासाठी सर्व देशांनी त्यांचे संघ घोषित केले आहेत आणि भारतीय संघाचीही घोषणा झालेली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला टी२० विश्वचषक संघामध्ये संधी मिळाली नाही आणि तो यामुळे निराश झाला आहे. असे असले तरीही, त्याचे आणखी अनेक मोठे लक्ष्य आहेत आणि तो संघाच्या विजयामध्ये नेहमी महत्वाचे योगदान देऊ इच्छित असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणे आनंदाची गोष्ट आहे, असेही त्याने म्हटले आहे.
स्पोर्टस्टारशी बोलताना मोहम्मद सिराजने सांगितले की, टी२० विश्वचषकात खेळणे त्याचे स्वप्न होते. तो म्हणाला, “निवड माझ्या हातात नाही. टी ० विश्वचषकामध्ये खेळणे निश्चित स्वरूपात एक स्वप्न होते. पण तरीही सर्व संपलेले नाही. माझ्याकडे अजून खूप लक्ष्य आहेत. सर्वात महत्वाचे लक्ष्य संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणे. मला संधी मिळाली नसली तरीही मी चांगले प्रदर्शन करणे चालू ठेवणार आहे आणि आशा आहे की, मी पुढे संघात स्थान मिळवण्यामध्ये यशस्वी राहील.”
इंग्लंड दौऱ्याबाबत सिराज म्हणाला, “खूप अप्रतिम अनुभव राहिला. मला आनंद आहे की, मी कर्णधार विराट भाई, प्रशिक्षक रवी शास्त्री, सपोर्ट स्टाफ आणि संघाचा विश्वास मिळवू शकलो आणि खेळू शकलो. शमी भाई, इशांत भाई आणि जसप्रीत भाई यांच्यासारख्या गोलंदाजांसोबत गोलंदाजी करून मला खूप काही शिकायला मिळाले. ते नेहमी मला गोलंदाजीमध्ये महत्वाचे सल्ले देत होते. इंग्लंडमध्ये खेळणारा संघ सर्व विभागांमध्ये मजबूत होता आणि कोहलीसारख्या प्रेरणादायी कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणे आनंदाचा गोष्ट होती.”
सिराजने कसोटी मालिकेतील लाॅर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत सांगितले की, “तेथील प्रदर्शनाला मी शब्दात सांगू शकत नाही. त्याला क्रिकेटचे मक्का म्हटले जाते. तेथे खेळणे आणि संघाला जिंकण्यासाठी मदत करणे एक अविस्मरणीय अनुभव होता. ईमानदारीने सांगायचे तर येथे दोनदा हॅट्रीकपासून हुकल्यानंतर मी जास्त विचार केला नाही. मी ५ विकेट्स हुकल्यामुळे निराश होतो.” त्याने शेवटी सांगितले की, तो आता देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये संघाच्या विजयासाठी महत्वाचे योगदान देऊ इच्छित आहे.
महत्वाच्या बातम्या-
संजूच्या राजस्थान रॉयल्सला लिविंगस्टोन मिळवून देणार फायनलचं तिकीट! बजावेल महत्त्वाची भूमिका
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! मालिका सुरू होण्याच्या दोन तासआधी न्यूझीलंडने रद्द केला दौरा
आरसीबीच्या फलंदाजांच्या पहिल्या टप्प्यातील ३ ‘ब्लॉकब्लास्टर खेळी’, पडीक्कलचे नाबाद शतकही आहे यादीत