---Advertisement---

पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! मालिका सुरू होण्याच्या दोन तासआधी न्यूझीलंडने रद्द केला दौरा

On: शुक्रवार, सप्टेंबर 17, 2021 4:55 PM
---Advertisement---

न्यूझीलंडने क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाचा पाकिस्तान दौरा तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड सरकारच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या सूचनेनंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच न्यूझीलंड संघ मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला पोहोचला होता. पहिला वनडे सामना खेळण्याच्या काही तास आधी हा निर्णय घेण्यात आला. आज (१७ सप्टेंबर) दोन्ही संघांमधील पहिला सामना रावळपिंडी येथे होणार होता.

मर्यादित षटकांच्या खेळल्या जाणार होत्या मालिका
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार होती . त्यातील पहिला सामना १७ सप्टेंबरला, दुसरा सामना १९ सप्टेंबरला आणि तिसरा सामना २१ सप्टेंबरला रावळपिंडीमध्येच खेळण्याचे नियोजित केले गेले होते. वनडे मालिकेनंतर तीन टी२० सामन्यांची मालिका देखील दोन देशांच्या दरम्यान रंगणार होती. टी२० मालिकेचे तीनही सामने लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर होणार होते. मात्र, दौरा रद्द झाल्याने हे सामने खेळण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे.

१८ वर्षानंतर होणार होती मालिका
न्यूझीलंडचा संघ तब्बल १८ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आला होता. यापूर्वी, ख्रिस केर्न्सच्या नेतृत्वात न्‍यूझीलंड संघाने २००३ मध्ये पाकिस्तान दौरा केलेला. त्या दौऱ्यात न्यूझीलंडला पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ५-० असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, २००९ मध्य देखील न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर येण्याचे निश्चित झालेले. मात्र, श्रीलंका संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आलेला.

चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
न्‍यूझीलंड संघाने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. काहींनी भविष्यात न्यूझीलंड विरुद्ध कधीही कोणत्याही क्रिकेट मालिकेत पाकिस्तानने सहभागी होऊ नये असे सुचवले. पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डनेदेखील सुरक्षेची हमी दिली असल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ ३ कारणांमुळे रोहितला टी२०चा कर्णधार बनवणे बीसीसीआयची मोठी चूक, नंतर होईल पश्चाताप!

भारतानंतर पाकिस्तानात बदलाचे वारे, नव्या बोर्ड अध्यक्षाचे बाबरच्या नेतृत्त्वपदाबाबत मोठे विधान

ना मोनालिसा, ना लोलिता, ही तर चहलची ‘परम सुंदरी’; धनश्रीच्या जबरदस्त डान्सने इंटरनेटवर लावली आग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---