---Advertisement---

या ऑलिम्पिक पदक विजेत्या धावपटूला आयपीएलमध्ये खेळायचे आहे या संघांकडून

On: बुधवार, डिसेंबर 4, 2019 6:26 PM
---Advertisement---

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकणारा जमैकन धावपटू योहान ब्लॅकने त्याच्या खेळातून निवृत्त झाल्यानंतर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रोड सेफ्टी विश्व टी20 मालिकेचा प्रचार करण्यासाठी योहान ब्लॅक भारतात आला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार असून यामध्ये सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारासारखे दिग्गज खेळाडू भाग घेतील. तथापि ब्लॅक हा स्पर्धेत खेळू शकणार नाही कारण तो अ‍ॅथलिट आहे आणि ऑलिम्पिकची तयारी करीत आहे.

मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार ब्लॅक म्हणाला, “माझ्याकडे ट्रॅक आणि फील्ड या क्रीडाक्षेत्रामध्ये अजून दोन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर मी क्रिकेटमध्ये येईन पण, मला वेस्ट इंडिजकडून खेळण्याची इच्छा नाही. मला फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये खेळायला आवडेल. मला भारतात एक फ्रँचायझी घ्यायला देखील आवडेल.”

इतकेच नव्हे तर ब्लॅकने सांगितले की कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळायलाही त्याला आवडेल.

हे दोन्ही संघ त्याला आवडतात कारण त्याच्या देशातील ख्रिस गेल बेंगलोरकडून खेळला आहे. याशिवाय ब्लॅकला विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे खेळाडू देखील आवडतात.

29 वर्षीय ब्लॅकला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची ऑफरही देण्यात आली होती. पणसध्या डोहा येथे होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी आणि पुढीलवर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करायचे असल्याने त्याने ही ऑफर नाकारली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---