---Advertisement---

इंग्लंडने नवा चेंडू घेतला अन् क्षणात चित्र पलटलं! रोहित-पुजारानं एकाच षटकात गमावल्या विकेट, पाहा व्हिडिओ

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 12:42 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या पूर्ण रोमांचक स्थितीत चालू आहे. इंग्लंडने पहिल्या डावात भारतीय फलंदाजांना १९१ धावांवर गारद केले. त्यानंतर भारतीय संघाने देखील चांगली सुरुवात करत पहिल्या दिवसाअंती इंग्लंडच्या ३ फलंदाज माघारी धाडले होते. ज्यानंतर इंग्लंडच्या मधल्या आणि तळातल्या फलजाजांनी चांगली कामगिकी करत संघाला २९० धावांपर्यंत पोहचवले. तसेच इंग्लंडने ९९ धावांची आघाडी देखील मिळवली. मात्र, दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजांनी कमालीची फलंदाजी केली खास करून रोहित शर्माने केलेली शतकी खेळी.

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित आणि केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी ८३ धावा केल्या. भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल ४६ च्या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघाचा डाव चांगलाच सावरला. रोहित आणि पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. मात्र, तिसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकनंतर नवीन चेंडू घेण्यात आला.

इंग्लंडने ८१ व्या षटकात नवीन चेंडू घेताच ऑली रॉबिन्सनने रोहित आणि पुजाराला माघारी धाडले. ८१ व्या षटकातील पहिला चेंडू रोहितला समजण्यात अडचण झाली. रोहितने मारलेला हा चेंडू सरळ ख्रिस वोक्सच्या हातात झेल गेला. आणि रोहित शर्माची शानदार १२७ धावांची खेळी संपुष्टात आली.

https://twitter.com/englandcricket/status/1434182094826074116

ज्यानंतर ८१ व्या षटकातीलच अखेरच्या चेंडूवर पुजाराने देखील ६१ धावांवर आपली विकेट गमावली. अशा तऱ्हेने दोन्ही सेट फलंदाजांची खेळी संपुष्टात आली.

https://twitter.com/SonySportsIndia/status/1434183842303131654

दरम्यान, पहिल्या डावात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. शार्दुल ठाकुर(५७) आणि कर्णधार विराट कोहलीच्या (५०) अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने समाधानकारक १९१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने देखील खराब सुरुवात केली होती. मात्र, मधल्या आणि तळातल्या फळीतील फलंदाजांनी इंग्लंडचा डाव सावरत २९० धावा करत भारतीय संघासमोर ९९ धावांची आघाडी ठेवली.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. रोहित शर्माच्या शतकी(१२७) आणि चेतेश्वर पुजाराच्या(६१) अर्धशतकी खेळीसह भारतीय संघाची स्थिती ९२ व्या षटकापर्यंत ३ गड्यांच्या बदल्यात २७० अशी होती. यासह भारतीय संघाला १७१ धावांची आघाडी मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या –
नाद खुळा! विदेशातील पहिले कसोटी शतक झळकावताना रोहितने मारलेला षटकार, पाहा व्हिडिओ
बाद की नाबाद? ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या विकेटवर वादाला सुरुवात
क्या बात है! क्रिकेटमध्ये अवघड वाटणाऱ्या ५ विक्रमांपैकी दोन आहेत भारतीयांच्या नावावर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---