आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या हंगामात गुरुवारी (२३ सप्टेंबरला) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. यामध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईसाठी दुसऱ्या टप्प्याची सुरुवात खराब झाली असेच म्हणावे लागेल, कारण पहिल्या सामन्यता चेन्नई सुपर किंग्स आणि आता कोलकाता नाइट रायडर्स यांच्याविरुद्धच्या दोन्ही सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला आहे. केकेआरविरुद्ध कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी काॅकने सामन्याची चांगली सुरुवात करून दिली होती. तरीही, मुंबईला मोठी धावसंख्या करता आली नाही. सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित खूप निराश दिसला आहे.
रोहितने उघड केली नाराजी
रोहित म्हटला आहे की, “काही भाग असे राहिले आहेत, जे आमच्यासाठी चुकीचे ठरले. आम्ही खूप चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर आम्ही जास्थ धावा करू शकलो नाहीत. मला वाटते की ही चांगली खेळपट्टी होती. मात्र, आम्ही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकलो नाहीत आणि सुरुवातीला गोलंदाजीही चांगली केली नाही. मला यात जास्त घुसायचे नाही, तुमच्यासोबत अशाप्रकारच्या गोष्टी होऊ शकतात आणि तुम्हाला पुढे जायचेच असते. चांगल्या सुरुवातीनंतर आम्हाला भागीदारी बनवण्याची गरज होती, पण आम्ही सतत विकेट्स गमावत राहिलो.”
“क्रीजवर येताच चेंडूला हिट करायला सुरुवात करणे, नवीन फलंदाजासाठी सोपे नसते. हे तसेच आहे, जे मागच्या सामन्यातही आमच्या सोबत घडले होते, आम्ही याविषयी चर्चा करू. तुमच्या डोक्यात नेहमी हे असते की, तुम्ही सामन्यात कुठे उभे आहात. आम्ही अजूनही गुणतालिकेच्या मध्यभागी आहोत. आम्हाला पुनरागमन करावे लागेल. सतत काही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.” असेही रोहीत म्हटला आहे.
मुंबईची झाली होती घसरगुंडी
दरम्यान, केकेआर आणि मुंबईच्या सामन्यामध्ये केकेआरणे नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी काॅक या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली, त्यांनी ९.१ षटकात ७८ धावांची भागीदारी पार पाडली. नंतर रोहित सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहितच्यानंतर मुंबईचे फलंदाजा एकापाठोपाठ एक बाद होत गेले आणि धावसंध्या २० षटकांत १५५ झाली. डी काॅकने मुंबईसाठी ४२ चेंडूत ५५ धावांची महत्वाची खेळी केली होती.