आयपीएल 2023 स्पर्धेच्या 34व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आमना-सामना झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 7 धावांनी शानदार विजय मिळवला. तसेच, हंगामातील दुसरा विजय नावावर केला. हा सामना जिंकल्यानंतर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने संघसहकाऱ्यांची प्रशंसा केली. सध्या याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे.
वॉर्नरकडून ईशांत शर्माचे कौतुक
हैदराबादला 7 धावांनी नमवल्यानंतर डेविड वॉर्नर (David Warner) याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “हैदराबादचे प्रेक्षक खूपच शानदार आहेत. सर्वांनी चांगला पाठिंबा दिला. आम्ही आव्हानांचा धैर्याने सामना केला आणि दोन गुण मिळवले. अक्षर आणि कुलदीप यांच्याकडे चांगला अनुभव आहे. मधल्या षटकात त्यांना चांगल्याप्रकारे वापरले.” ईशांतबद्दल बोलताना तो म्हणाला की, “ईशांतने खूपच मेहनत केली आहे आणि चांगली गोलंदाजी केली आहे. आम्ही पुढील सामना जिंकण्याचा प्रयत्न करू.”
सामन्याचा आढावा
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने शानदार सुरुवात केली नाही. त्यांना पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फिल सॉल्ट झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नर हादेखील 21 धावा करून झेलबाद झाला. मात्र, मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांच्यात 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. त्यामुळे दिल्लीला 20 षटकात 144 अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
…and breathe, Dilliwaalon 😮💨
Our boys have clinched the thriller ✅#YehHaiNayiDilli #IPL2023 #SRHvDC pic.twitter.com/oUSnTUHvAB
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 24, 2023
हैदराबादच्या फलंदाजांनी केले निराश
दिल्लीच्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांनी निराश केले. त्यांनी खूपच आरामात डाव पुढे नेण्याची योजना आखली. हैदराबादच्या फक्त 6 विकेट्स पडल्या होत्या. त्यांच्याकडून फक्त मयंक अगरवाल याने 39 चेंडूत सर्वाधिक 49 धावांची खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त हेन्रीच क्लासेन यानेही 19 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. तसेच, वॉशिंग्टन सुंदर हादेखील 24 धावांवर नाबाद राहिला. मात्र, इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्यामुळे हैदराबादला 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. (after the second consecutive win david warner said a this thing about teammates know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या 5.50 कोटींच्या गोलंदाजाने राखली संघाची लाज! SRHच्या पारड्यात पराभवाची हॅट्रिक, वाचा सविस्तर
मोठी बातमी! विराटला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नेतृत्व करणे महागात, ‘या’ चुकीसाठी बसला लाखोंचा दंड