---Advertisement---

धोनीबद्दलच्या वक्तव्यानंतर आता विराटची इंस्टा स्टोरी चर्चेत! पाहा काय लिहिले

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 7:21 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या चर्चांमध्ये आहे. आशिया चषक सुरू झाल्यापासून विराट त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. पाकिस्तानविरुद्ध रविवारी (4 सप्टेंबर) सलग दुसरे अर्धशतक केल्यानतंर त्याने माध्यांशी चर्चा करताना एक मोठी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता त्याने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. 

Virat kohli Screengrab

विराट कोहली (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर म्हटला होता की, “जेव्हा मी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हा एमएस धोनी (MS Dhoni) सोडून इतर कोणीही मला मेसेज केला नाही.” त्याच्या या वक्याव्यानंतर माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता विराटने इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून सुचक इशारा दिला आहे. विराटने लिहिले आहे की, “जे तुमच्या आनंदात आनंद आणि दुःखात दुःख मानतात, त्यांना तुमच्या मनात विशेष स्थान द्या.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

पीछे देखो पीछे! अगदी हास्यास्पद पद्धतीने बाद झाला हा फलंदाज; पाहा मजेदार व्हिडिओ
AUSvsNZ: मॅक्सवेलच्या जबरदस्त झेलने गप्टिलला दाखवला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडिओ
मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक टी-20 विश्वचषकात घालणार राडा! बेबी एबीची संधी हुकली  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---