भारत आणि श्रीलंका संघात एकदिवसीय सामन्यांची मालिकेनंतर ३ सामन्यांची टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२९ जुलै) झाला. हा तिसरा सामना निर्णायक सामना होता. कोलंबो येथील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या तिसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत भारतीय संघाला ७ गडी राखून पराभूत केले आहे आणि ही टी २० मालिका २-१ ने आपल्या नावे केली. दरम्यान पुन्हा एकदा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने खराब कामगिरी केली आणि चाहत्यांच्या निशाण्यावर आला.
चाहते भडकले संजू सॅमसनवर
भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात ७ विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर चाहते संजू सॅमसनवर राग व्यक्त करत आहेत. खरं तर संजू सॅमसन या दौऱ्यावरील प्रत्येक सामन्यात फ्लॉप ठरला आहे. शेवटच्या टी२० सामन्यातही तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याची जोरदार थट्टा केली जात आहे. चाहत्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडचे देखील मजेदार मिम्स बनवत सॅमसनला ट्रोल केले आहे.
Mood right now ???? #SLvIND pic.twitter.com/95nA9Ypp3h
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 29, 2021
Guess #SanjuSamson is testing the temperament of the selectors instead. Not sure with this talent pool, selectors will be patient with him as the selectors were once with #RohitSharma. His weakness with spinners is alarming. In present times, 10 T20Is is a luxury. #INDvSL
— G. S. Vivek (@GSV1980) July 29, 2021
https://twitter.com/amirsha32740231/status/1420765343308386311?s=20
#SanjuSamson Let's See his career ????
10 inns
117 runs
11.7 avg
110 SR
27 HS#ThankYouSamson pic.twitter.com/TfWRgXXQaB— Pritam Biswas (@pritambiswas_18) July 29, 2021
Runs scored by Sanju Samson today #SanjuSamson pic.twitter.com/Jh5UbkSNcf
— @iammp (@maheshspawar1) July 29, 2021
https://twitter.com/AlexAngurajoffl/status/1420767929201676295?s=20
#SanjuSamson
in IPLIn international career#SLvIND pic.twitter.com/H72yygdRdH
— பிரிட்டோ J.B (@brittojanc) July 29, 2021
#SLvIND #INDvsSL #INDvsSL2021#SanjuSamson #samson #RahulDravid #Dhawan #Sanju
Rahul Dravid after watching performance of Sanju Samson – pic.twitter.com/mTf2QzAoUM
— ZALA KISHANSINH (@iamzala9) July 29, 2021
https://twitter.com/36__NotAllOut/status/1420773125831086080?s=20
या तिसऱ्या टी२० सामन्यात अवघ्या ८१ धावांवर भारतीय संघातील सर्व गडी बाद झाले होते. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने सलामी फलंदाजी करताना १४ धावा केल्या. तर कर्णधार शिखर धवन खाते न उघडता तंबूत परतला. त्यानंतर पडीक्कल फलंदाजी करण्यास आला तो देखील फक्त ९ धावा करून बाद झाला. तर संजू सॅमसनचा खराब फॉर्म शेवटच्या सामन्यातही दिसून आला. या सामन्यातही तो शून्य धावेवर परतला. नितीश राणाने ६ धावा काढल्या. त्यानंतर संघाला सावरत उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवने अनुक्रमे १६ आणि २३ धावा केल्या. तर राहुल चहर आणि चेतन सकारिया यांनी ५-५ धावा केल्या. वरूण चक्रवर्ती देखील ० वर बाद झाला.
अशाप्रकारे अवघ्या ८२ धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर श्रीलंका संघाने १४.३ षटकात ३ गडी गमावत हे लक्ष्य साध्य केले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० मालिका विजयानंतर वैरत्व विसरुन शनाकाने दाखवला मनाचा मोठेपणा, द्रविड अन् धवनचे मानले आभार
पडीक्कलचा चौकार अडवण्यासाठी श्रीलंकेचे तब्बल ४ खेळाडू धावले चेंडूमागे, Video पाहून व्हाल लोटपोट
विरोधकांना चोप देत ‘या’ संघांनी वनडेत सर्वाधिक वेळा उभारल्यात ४०० धावा, भारत दुसऱ्यास्थानी






