आयपीएलच्या फायनलमध्ये आंद्रे रसेलनं 19 धावांत तीन विकेट्सह हैदराबादवर गोलंदाजीचा भेदक मारा केला. तर व्यंकटेश अय्यरच्या (नाबाद 52) शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं रविवारी (26 मे) रोजी झालेल्या आयपीएल फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. 57 चेंडू शिल्लक असताना तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं. हैदराबादला 18.3 षटकांत 113 धावांत गुंडाळल्यानंतर कोलकातानं 10.3 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात 114 धावा करून एकतर्फी विजय मिळवला.
व्यंकटेशने केवळ 26 चेंडूंत नाबाद 52 धावा करताना, 4 चौकार आणि 33 षटकार ठोकले. रहमानउल्ला गुरबाजनं 32 चेंडूत 39 धावा करताना 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची सामना जिंकणारी भागीदारी केली.
केकेआरच्या विजयानंतर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. गंभीरला हा आनंद देण्याचं काम आंद्रे रसेलनं केलं. त्यानं दमदार गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. या विजेतेपदावर रसेल खूप भावूक झाला होता. त्यानं ही ट्रॉफी त्याच्या बाजूनं केकेआरला भेट म्हणून दिली.
आंद्रे रसेल भावूक झाला आणि म्हणाला, “या क्षणाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे सध्या शब्द नाहीत. आमच्यासाठी किंवा माझ्यासाठी हा क्षण खूप मोलाचा आहे. मला खूप आनंद झाला आहे. की, एक संघ म्हणून आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. या फ्रेंचाइजीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. ही माझ्याकडून त्यांच्यासाठी भेट आहे. ”
📽️ 𝗥𝗔𝗪 𝗥𝗘𝗔𝗖𝗧𝗜𝗢𝗡𝗦
Moments of pure joy, happiness, jubilation, and happy tears 🥹
What it feels to win the #TATAIPL Final 💜
Scorecard ▶️ https://t.co/lCK6AJCdH9#KKRvSRH | #Final | #TheFinalCall | @KKRiders pic.twitter.com/987TCaksZz
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
केकेआरचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण म्हणाले, “माझ्या मते गेली दोन वर्षे आमच्यासाठी खूप कठीण होती. आम्ही प्ले-ऑफसाठी पात्र ठरू शकलो नाही. त्यासाठी आम्हाला आमच्या कामगिरीवर विचार करण्याची गरज होती. पण आता आम्ही हा क्षण साजरा करू शकतो. आमच्यासाठी हा क्षण मोलाचा तसंच आनंददायी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुख खाननं केलं बीसीसीआयला ट्रोल, ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर दिलं ‘फ्लाइंग किस’; पाहा VIDEO
केवळ गंभीरमुळे चॅम्पियन बनला नाही केकेआर, पडद्यामागे राहून ‘या’ व्यक्तीनं घडवलाय चमत्कार!
काय सांगता! ट्राॅफी जिंकली कोलकातानं पण नारे लागले चेन्नईचे… किंग खानचा मैदानावरील व्हिडीओ व्हायरल