भारतीय संघ आणि त्यांचे चाहते १६ ऑगस्ट २०२१ चा दिवस कधीच विसरू शकत नाहीत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्व अडचणींवर मात करत भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध अविस्मरणीय विजयाची नोंद केली. भारतीय संघाच्या या विजयानंतर इंग्लंडमध्ये उपस्थित भारतीय चाहते हा ऐतिहासिक विजय साजरा करताना दिसले.
ब्रिटनमध्ये उपस्थित भारतीय चाहते रस्त्यांवर झुंबड उडवत आणि बॉलिवूड गाणे ‘सात समुंदर’वर जोरदार डान्स करताना दिसले. भारतीय चाहत्यांच्या डान्समुळे रस्त्यांवरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. यानंतर पोलीस देखील गर्दीच्या दरम्यान रस्त्याच्या मधोमध नाचू नका असे सांगताना दिसले.
भारतीय चाहत्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन रस्त्यावर जोरदार डान्स केला. पोलीस सतत चाहत्यांना नियंत्रित करताना दिसले तर रस्त्याच्या कडेला उपस्थित लोक त्यांच्या कॅमेऱ्यात हा मजेदार क्षण कैद करताना दिसले. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.
भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी डेव्हिड मलान आणि ओली पोप यांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे. दुसरीकडे, जर आपण भारतीय संघाबद्दल बोललो तर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानावर जाऊ शकतो.
After India's win against England at Lord’s, people were dancing on ‘Saat Samundar’ on the street in UK.#IndvsEng #ChakdeIndia pic.twitter.com/AEBymae1S8
— Dr. Ashish Belwal (@drsuperstar1680) August 18, 2021
लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजय
भारतीय संघाने सोमवारी (१६ ऑगस्ट) लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर (इंग्लंड विरुद्ध भारत दुसरी कसोटी) इतिहास रचला. भारतीय संघाने यजमान इंग्लंडला फक्त ५१.५ षटकांत १२० धावांवर रोखत आश्चर्यकारक विजय मिळवला. एकवेळ असे वाटत होते की, इंग्लंड हा सामना जिंकू शकतो पण भारतीय संघाने चेंडू आणि बॅटसह अप्रतिम खेळ दाखवून हा सामना जिंकला. भारताने लॉर्ड्स कसोटी १५१ धावांनी जिंकली आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. संपूर्ण संघामुळे भारताला लॉर्ड्सवर विजय मिळाला. पण असे काही खेळाडू होते, ज्यांच्या योगदानाशिवाय हा विजय शक्य नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ‘या’ अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन
पुन्हा उडणार देशांतर्गत क्रिकेटचा धुरळा! ‘या’ दिवशी सुरू होणार नवा हंगाम
स्टायलिश हेयरस्टाईल अन् रंगबिरंगी जॅकेट घालून माही बनला ‘रॉकस्टार’; जाणून घ्या नव्या लूकमागचं गुपित






