भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. तत्पूर्वी डिसेंबर 2022च्या भीषण कार अपघातानंतर रिषभ पंतने (Rishabh Pant) पहिलाच कसोटी कसोटी सामना खेळला. दरम्यान त्याने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना संस्मरणीय शतक झळकावले. पण विजयानंतर पंतने खुलासा केला की, तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खास संदेश दिला होता.
रिषभ पंतने (Rishabh Pant) ब्रॉडकास्टरशी बोलताना सांगितले की, “जेव्हा आम्ही जेवणासाठी गेलो होतो, तेव्हा डाव घोषित करण्याबाबत चर्चा झाली होती. रोहित भाई म्हणाला की, एक तास खेळून बघू. कोणाला किती धावा करायच्या आहेत त्या करा. यानंतर माझ्या मनात आले की मी थोड्या वेगाने धावा करू शकतो, कोणाला माहीत आहे की मी 150 धावा करू शकतो.”
बांगलादेशविरुद्ध भारताने धमाकेदार कामगिरी केली. पाकिस्तानला 2-0 असा ऐतिहासिक क्लीन स्वीप दिलेल्या बांगलादेशचा भारताने धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने अश्विनचे शानदार शतक आणि यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजाच्या अर्धशतकांच्या जोरावर 376 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला डोक वर काढू दिले नाही. बांगलादेशला 149 धावांवर गार केले.
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात सर्वाधिक (Jasprit Bumrah) 4 विकेट्स घेतल्या. भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर दुसऱ्या डावात रिषभ पंत (Rishabh Pant) आणि शुबमन गिलच्या (Shubman Gill) झंझावाती शतकांमुळे भारताला 514 धावांची आघाडी मिळाली. भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच 234 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार भारतासाठी 6 विकेट्स आणि शानदार शतक झळकावलेल्या रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
“हा देवाचा आशीर्वाद असावा”, पंतच्या तुफानी शतकी खेळीवर अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया
अश्विनच्या मुलींसोबत कर्णधार रोहितचे प्रेमळ संभाषण, व्हिडिओ जिंकेल मन!
फलंदाजीदरम्यान बांगलादेशचे क्षेत्ररक्षण का लावले? रिषभ पंतने केला खुलासा