---Advertisement---

IPL 2023मध्ये ‘हे’ ३ बदल करत सीएसके करणार दमदार पुनरागमन, दुसरा बदल खूपच महत्त्वाचा

On: गुरूवार, जून 2, 2022 5:15 PM
MS-Dhoni-CSK
---Advertisement---

चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज यावर्षी मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल २०२२मध्ये सुरुवातीच्या आठ सामन्यांपर्यंत रवींद्र जडेजा सीएसकेचा कर्णधार होता, पण नंतर राहिलेल्या सामन्यांमध्ये एमएस धोनी पुन्हा एकदा कर्णधार बनला. या हंगामातील १४ पैकी फक्त ४ सामने सीएसकेने जिंकले आणि गुणतालिकेत त्यांचा संघ ९व्या क्रमांकावर राहिला. या खराब प्रदर्शनानंतर संघ नक्कीच पुढच्या हंगामापूर्वी काही बदल करण्याचा प्रयत्न करेल. आपण या लेखात अशाच महत्वाच्या तीन बाबी जाणून घेणार आहोत, ज्या पुढच्या आयपीएल हंगामात सीएसकेमध्ये बदललेल्या दिसू शकतात.

१. वेगवान गोलंदाजी अधिक घातक करण्याची गरज
आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) गोलंदाजी आक्रमण काही अंशी कमकूवत दिसले. त्यांचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर गंभीर दुखापतग्रस्त झाल्यामुळे संपूर्ण हंगामात खेळू शकला नाही. दीपकला खरेदी करण्यासाठी सीएसकेने मेगा लिलावात तब्बल १४ कोटी रुपये खर्च केले आणि तो मात्र संपूर्ण हंगामात खेळला नाही. जर हे पैसे सीएसकेला मेगा लिलावात दुसरीकडे खर्च करता आले असते, तर मात्र संघ अधिक मजबूत बनू शकत होता. वेगवान गोलंदाज मुकेश चौथरीने चांगले प्रदर्शन केले, त्याने १३ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या. अशात आगामी हंगामात सीएसके फ्रँचायझीला वेगवान गोलंदाजांवर जास्त लक्ष द्यावे लागेल.

२. संघाला नवीन कर्णधाराची गरज
सीएसकेला आता एका नवीन कर्णधाराची गरज आहे. रवींद्र जडेजाला यावर्षी कर्णधार बनवले गेले होते, पण त्याला ही जबाबदारी पेतला आली नाही. त्याने सुरुवातीच्या ८ सामन्यांपैकी ६ सामने गमावले आणि नंतर हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच, त्याचे वयदेखील झाले असून आता संघाला एका नवीन आणि युवा कर्णधाराची गरज आहे. अशात धोनी कोणत्या युवा खेळाडूला कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार करतो, हे पाहावे लागणार आहे. सीएसकेचे अनुभवी खेळाडू मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड आगामी काळात संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसू शकतात.

३. संघात अष्टपैलू खेळाडूंची करावी लागेल भरती
संघात अष्टपैलू खेळाडूंची कमी स्पष्टपणे दिसली. वेस्ट इंडिजचा दिग्गज ड्वेन ब्रावोचे देखील सध्या वय झाले आणि त्याच्याकडून अजून अपेक्षा ठेवणे देखील चुकीचे ठरू शकते. ब्रावो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक राहिला आहे, पण आता तो अपेक्षेप्रमाणे खेळताना दिसत नाही. अशात सीएसकेला पुढच्या हंगामात काही नवीन अष्टपैलू खेळाडूंची गरज असेल, जे संघाला संतुलन देऊ शकतील. या विभागात संघ युवा खेळाडूंना निवडू शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! रँडी ऑर्टन मोडणार जॉन सीनाचा ‘तो’ जबरदस्त विक्रम, ऑलिम्पिक विजेत्या कर्ट अँगलचा विश्वास

INDvsSA। आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर फळफळले मिलरचे नशीब; दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आखला प्लॅन

‘महिला आयपीएल’चा मुहूर्त ठरला! सीएसकेची वुमन्स टीमही स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---