---Advertisement---

भारतीय क्रिकेटर्सनी धरली अमेरिकेचे वाट! उन्मुक्त, मिलिंदनंतर आता मुंबईच्या ‘या’ खेळाडूचाही मोठा निर्णय

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 6:52 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट सध्या त्याच्या सर्वोच्च स्थितीत आहे. अशाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. मात्र वाढत्या स्पर्धांमुळे अनेकांना या स्वप्नापासून मुकावे लागते. त्यामुळे अनेक खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी अनेक नवी संधी शोधाव्या लागतात.

दरम्यान, अमेरिकेने क्रिकेटला चालना देण्यासाठी अमेरिकेत ‘मायनर क्रिकेट लीग’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये जगभरातील अनेक खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित देखील करण्यात आले आहे.

त्यामुळे क्रिकेटमध्ये भविष्य करण्याचे स्वप्न असलेले अनेक खेळाडू आता, अमेरिकेतील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत आहेत. भारतातून देखील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे.

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय २०१२ साली विजय मिळवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंदने देखील काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अमेरिकेतील स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ अनेक भारतीय खेळाडूंनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यातच आता आणखी एक नवीन नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे हरमीत सिंग.

हरमीत सिंगने देखील २०१२ साली भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हरमित हा फिरकीपटू गोलंदाज आहे. हरमीत देखील आता अमेरिकेतील त्या स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहे. ज्यामध्ये त्याने ‘सिएटल थंडरबोल्ट’ या संघाशी ३ वर्षांचा करार देखील केला आहे. हरमितने प्रथम श्रेणीमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

याबाबत टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना हरमीत सिंग म्हणाला, “मी जुलै महिन्यातच निवृत्त झालो होतो. कारण, मला मुंबई संघाकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती. जो माझा घरेलू संघ आहे. मला अमेरिकेत खेळण्यासाठी चांगले पैसे मिळत आहेत. ज्यामुळे माझी भविष्याबाबतची चिंता मिटली आहे. तसेच इथल्या क्रिकेटचा स्तर देखील खूप चांगला आहे.”

“जर तुम्ही नियमित ३० महिने अमेरिकेमध्ये व्यतीत केले, तर तुम्हाला अमेरिकेच्याच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. मी आता माझे अमेरीकेतील १२ महिने पूर्ण केले आहेत. आता माझे केवळ १८ महिने बाकी आहे. २०२३ च्या सुरुवातीपर्यंत मी अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरू शकतो. तोपर्यंत मी ३० वर्षांचा होईल आणि एका फिरकीपटूसाठी ते योग्य वय आहे,” असेही तो म्हणाला.

हरमीत सिंगने २००९ मध्ये मुंबईकडून पदार्पण केले होते. मात्र, त्याला मुंबईकडून जास्त संधी मिळाली नाही. यादरम्यान त्याला त्याचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली नाही, असेही तो म्हणाला.

याबाबत बोलताना तो म्हणाला, “मी २००९ मध्ये मुंबईसाठी पदार्पण केले होते. मात्र, माझे कौशल्य दाखवण्यासाठी मला पूर्ण एक हंगाम देखील मिळाले नाही. तरीदेखील मी २०१७ पर्यंत मुंबईसाठी खेळत होतो. मात्र मला पूर्ण एका दशकात मुंबईकडून खेळण्यासाठी केवळ ९ सामने मिळाले. यामुळे मला अपयशी होण्यासाठी देखील संधी मिळाली नाही. त्यामुळे मला स्वतःला सिद्ध करता आले नाही, व तशी संधीही मला मिळाली नाही.”

हरमितने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळताना गोलंदाजी करताना ३१ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ८७ विकत घेतले आहेत. तसेच या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये हरमितने एकूण ७३३ धावा देखील केल्या होत्या. ज्यामध्ये १ शतकाचा देखील समावेश होता. अ दर्ज्याच्या क्रिकेटमध्ये त्याने १९ सामने खेळले होते. ज्यामध्ये २१ विकेट घेतल्या होत्या. हरमितने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे देखील प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये त्याने केवळ एक सामना खेळला होता.

दरम्यान, हरमीत सिंग पूर्वीही अनेक भारतीय खेळाडूंनी अमेरिकेचा रस्ता पकडला होता. ज्यामध्ये उन्मुक्त चंद, समित पटेल, मनन शर्मा, सिद्धार्थ त्रिवेदी, मिलिंद कुमार आणि आता हरमीत सिंग. या सर्व खेळाडूंनी भारतात क्रिकेटची संधी न मिळाल्यामुळे अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीग स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. यासंदर्भात या सर्व खेळाडूंनी तेथील संघांसोबत करार देखील केलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या –
“भारताला हार्दिककडून खूप अपेक्षा, मात्र त्याने…”
काय सांगता! रूटने केलेल्या धावांपेक्षा २५ टक्के धावा करण्यात कोहली, रहाणे आणि पुजारा अपयशी
जेम्स अँडरसन आणि शमीला तर मागे सोडले, आता शाहीन आफ्रिदी तोडू शकतो सिराजचा ‘हा’ विक्रम

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---