वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघ विजय मिळवण्याच्या स्थितीत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फावद आलमने तुफानी शतक झळकावले आहे. तर शाहिद आफ्रिदिला देखील मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. पाहुण्या संघाने या आमंत्रणाचा स्वीकार करत पहिल्याच डावात ९ बाद ३०२ धावा करत डाव घोषित केला होता. या डावात पाकिस्तान संघाकडून फावद आलमने १७ चौकरांच्या साहाय्याने नाबाद १२४ धावांची खेळी केली. तर बाबर आजमने १३ चौकारांच्या साहाय्याने ७५ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिज संघाला ३ गडी बाद ३९ धावा करण्यात यश आले आहे. वेस्ट इंडिज संघाकडून अल्जारी जोसेफ ० तर क्रूमाह बोनर १८ धावांवर फलंदाजी करून खेळपट्टीवर उपस्थित आहे. तर वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट या डावात अवघ्या १७ धावा करत माघारी परतला होता.
या डावात पाकिस्तान संघाकडून वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक २ गडी बाद केले. जर त्याने या डावात आणखी २ गडी बाद केले तर, तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ मध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराजला मागे सोडू शकतो.
मोहम्मद सिराजने आतापर्यंत एकूण ११ गडी बाद केले आहेत. त्याने आतापर्यंत जेम्स अँडरसन(९) आणि मोहम्मद शमी(७) यांना मागे सोडले आहे. शाहिनने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ मध्ये आत्तापर्यंत १० विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर १२ विकेट्ससह जसप्रीत बुमराह आहे.
शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत एकूण १८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३.१० च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत ६६ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘फिटनेस किंग’ विराट कोहली पितो ब्लॅक वॉटर, एका लीटरची किंमत उडवेल तुमची झोप
“जर मी रूटच्या जागी असतो, तर मी बेन स्टोक्सला पुन्हा बोलवले असते”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचा सल्ला