---Advertisement---

*कसोटी क्रिकेटचे सौंदर्य! वेस्ट इंडीजच्या विजयाने लारांच्या डोळ्यात पाणी, गिलक्रिस्टने मारली मिठी । VIDEO*

Brian Lara Shamar Joseph
---Advertisement---

वेस्ट इंडीजसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात मिळालेला विजय ऐतिहासिक ठरला. रविवारी (28 जानेवारी) गाबा स्टेडियमवर हा सामना वेस्ट इंडीजने 8 धावांनी जिंकला आणि मालिका 1-1 अशा बरोबरीत सोडवली. शमार जोसेफ याने दुखापतीनंतर दुसऱ्या दिवशी शानदार पुनरागमन करत सात विकेट्स घेतल्या. सामनावीर पुरस्कार देखील जोसेफलाच दिला गेला. जोसेफने शेवटची विकेट घेताच मैदानातील प्रत्येत कॅरेबियन चाहता वेगळ्या उंचीवर असल्याचा अनुभव घेत होता. माजी दिग्गज ब्रायन लारा देखील या विजयानंतर भावूक झाले.

ऑस्ट्रेलियन संघ गाबा कसोटीच्या (Gabba Test) चौथ्याच दिवशी सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडीजने विजय मिळवला. शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियालि विजयासाठी 216 धावा हव्या होत्या. तिसऱ्या दिवसाखेर 2 बाद 60 धावा ही ऑस्ट्रेलियाची धावसंख्या होती. पण तिसऱ्या दिवशी 8 विकेट्स हातात असतानाही ऑस्ट्रेलियन संघ राहिलेल्या 156 धावा करू शकला नाही. एकटा स्टीव स्मिथ (Steve Smith) सोडली, तर एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज या डावात अपेक्षित खेळी करू शकला नाही. स्मिथ 91* धावा करून शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकला. दुसरीकडे कॅमरून ग्रीन (42), ट्रेविस हेड (0), मिचेल मार्श (10), ऍलेक्स केरी (2), मिचेल स्टार्क (21), पॅट कमिन्स (2) आणि जोश हेजलवूड (0) या सात खेळाडूंनी शमार जोसेफच्या चेंडूवर विकेट्स गमावल्या.

शमार जोसेफच्या घात गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजला हा विजय मिळाला. मागच्या 27 वर्षांमध्ये वेस्ट इंडीजला ऑस्ट्रेलियात मिळालेला हा पहिलाच विजय होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पायाच्या अंगठ्याला चेंडू लागल्याने शमार जोसेफ मैदानातून बाहेर झाला होता. पण चौथ्या दिवसी त्याने जबरदस्त पुनरागमन केले आणि मॅच विनर देखील ठरला. माजी वेस्ट इंडीज कर्णधार ब्रायन लारा (Brian Lara) यावेळी समालोचकाची भूमिका पार पाडत होते. समालोचन करताना त्यांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. कॉमेंट्री बॉक्समधील हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवूड याच्या रुपात शेवटची विकेट गमावली. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित लारा, गिलक्रिस्ट आणि न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक इयान स्मिथ अक्षरशः जल्लोष करताना दिसले. माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर ऍडम गिलक्रिस्ट याने लारांना या मोठ्या विजयासाठी शिब्छा दिल्या. व्हायरल व्हिडिओत लारा म्हणत आहेत, “वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवण्यासाठी 27 वर्ष लागले. या युवा खेळाडूंनी बरलेल्या संघाने हे करून दाखवले. वेस्ट इंडीज क्रिकेट आज भक्कमपणे उभे आहे. संघीतल पत्येक खेळाडूला खूप-खूप शुभेच्छा.”

दुसरीकडे गबा कसोटीतील परभव ऑस्ट्रेलियासाठी खूप मोठा आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाने एकाद्या डे-नाईट कसोटी सामन्यात परभव स्वीकारला आहे. (After West Indies beat Australia in the Gabba Test Brian Lara got emotional in the commentary box)

महत्वाच्या बातम्या – 
AUS vs WI । कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर! कॅरेबियन गोलंदाजांकडून यजमान ऑस्ट्रेलियाला धक्का
KIYG 2023: वेटलिफ्टर आरती ताटगुंटी, ए व्ही सुश्मिता यांनी राष्ट्रीय विक्रमासह जिंकलं सुवर्ण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---