---Advertisement---

ढोल-ताशा आणि डान्स, भारतीय हॉकी संघाचं मायदेशात अश्या पध्दतीनं स्वागत! पाहा VIDEO

---Advertisement---

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हाॅकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून किर्तीमान रचला आहे. त्यासोबतच  तब्बल 52 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये सगल कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकी संघ सलग कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. नुकताच, भारतीय हॉकी संघ आता मायदेशी परतला आहे. संपूर्ण देश हा आनंद साजरा करत आहे.

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर हाॅकी संघाचे स्वागत हिरो प्रमाणे करण्यात आले. ढोलाच्या तालावर वादक नाचतवत त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला, “एक पदक हे पदक असते, देशासाठी ते जिंकणे हे मोठे काम असते. आम्ही सुवर्ण पदकाचे स्वप्न पाहत होतो, पण हे स्वप्न पूर्ण झाले नाही. पण, आम्ही रिकाम्या हाताने आलो नाही. आम्हाला मिळत असलेल्या प्रेमामुळे आमची जबाबदारी वाढते. आम्ही देशासाठी पुन्हा पदक आणण्याचा प्रयत्न करू.”

संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा सामना होता. हा त्याच्यासाठी भावनिक क्षण होता. विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात श्रीजेशची भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्यासोबत दोन कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर असेल.

ऑलिम्पिकमधील संघाच्या विजयानंतर मध्य प्रदेश सरकारने भारतीय हॉकी संघाचा खेळाडू विवेक सागर प्रसाद याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विवेक सागर यांना फोनवर सांगितले , “ही चांगली कामगिरी होती. संपूर्ण देश तुमच्या सर्वांवर आनंदी आहे. या यशाबद्दल तुमचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. मध्य प्रदेश सरकार लवकरच तुमच्या खात्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करेल.

हेही वाचा-

‘..तर आम्ही फिफा विश्वचषकही जिंकू’, सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा हास्यास्पद दावा
निवृत्तीनंतरही गोलकीपर श्रीजेश भारतीय संघासोबतच राहणार, हॉकी इंडियानं सोपवली मोठी जबाबदारी
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---