---Advertisement---

सीपीएल विजेत्यांना झाली रविचंद्रन अश्विनची मदत! स्वतः कर्णधार इमरान ताहिरकडून खुलासा

On: सोमवार, सप्टेंबर 25, 2023 5:59 PM
Ravichandran Ashwin Imran Tahir
---Advertisement---

कॅरेबियन प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाने पटकावले. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज ईमारान ताहिर या संघाचे नेतृत्व करत असून सीपीएलच्या इतिहासात पहिल्यांता गयाना संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. कर्णधार म्हणून ताहिरची भूमिका या संपूर्ण हंगामात महत्वाची राहिली. पण कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याला भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विन याचा सल्ला मिळाला होता. विजयानंतर स्वतः ताहिरनेच हा खुलासा केला.

कॅरेबियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना ट्रिनबागो नाईट रायडर्स आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्स यांच्यात रविवारी (24 सप्टेंबर) खेळला गेला. गयाना संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजाला आलेला ट्रिनबागो नाईट रायडर्स संघ 18.1 षटकात 94 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात गयाना संघाने 14 षटकांमध्ये अवघी एक विकेट गमावून हा सामना जिंकला. सामना जिंकल्यानंतर गयाना संघाचा कर्णधार ईमरान ताहिर () भावूक झाला. यावेळी रविचंद्रन अश्विन () याने दिलेल्या पाठिंब्याचा कर्णधार म्हणून फायदा झाला, हे ताहिरने मान्य केले.

ट्रॉफी जिंकल्यानंतर ताहिर माध्यमांसमोर म्हणाला, “हा खूपच खास अनुबव होता. जेव्हा मला संघाचे कर्णधारपद मिळाले, तेव्हा अनेकांनी याविषयी नकारात्मक विधाने केली. मी आता अभिमान वाटत आहे, यासाठी देवाचे आभार. खूप खुश आहे. सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. रविचंद्रन अश्विनचे खूप-खूप आभार. हंगाम सुरू होण्याआधी त्याने सांगितले होते की, मी हे करू शकतो, सीपीएल जिंकू शकतो. जेव्हा मला कर्णधार बनवले गेले, तेव्हा अनेकांना याविषयी मजा घेतली होती.”

दरम्यान, उभय संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्याचा विचार केला, तर ड्वेन प्रिटोरीयस सामनावीर ठरला. ड्वेनने गयाना संघासाठी 4 षटकांमध्ये 26 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या – 
विश्वचषकाच्या 10 दिवसांपूर्वी इंग्लंडमधून मोठी भविष्यवाणी; दिग्गज म्हणाला, ‘भारताला जो संघ हरवेल, तो…’
कपिल देव किडनॅप? खळबळजनक पोस्ट करत गंभीरही म्हणाला, ‘ही क्लिप तुम्हालाही आली का?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---