भारतीय संघाने गुरुवारी (३० डिसेंबर) दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्यांचा पहिला विजय मिळवला. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरला सुरू झाला होता. गुरूवारी (३० डिसेंबर) भारताने या सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि मुलगी वामिका (Wamika Kohli) या दोघीही सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. अशात विजय मिळवल्यानंतर विराट त्याच्या मुलीकडे पाहून आनंद व्यक्त करताना दिसला आहे.
विराट कोहलीची मुलगी वामिका कोहली हिच्यासाठी स्टेडियमच्या स्टॅन्ड्समध्ये बसून सामना पाहण्याची ही पहिलीच वेळ होती आणि विराटने हा क्षण स्मरणीय बनवला आहे. वामिकाला सध्या कळत नसावे की, तिच्या वडिलांनी या सामन्यात विजय मिळवला आहे आणि ही एक मोठी कामगिरी आहे. परंतु मोठी झाल्यावर जेव्हा ती हा व्हिडिओ पाहिल, तेव्हा तिलाही आनंद वाटेल.
दक्षिण अफ्रिकेचा पराभव केल्यानंतर कर्णधार विराट कोहली खूपच उत्साहात दिसला. विराट स्टॅन्ड्समधून सामना पाहणाऱ्या त्याच्या मुलीकडे पाहून हातवारे करत होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चाहत्यांनी खूपच व्हायरल केला आहे.
https://twitter.com/Sectumsempra187/status/1476507630231191554?s=20
Virat Kohli looking at Vamika & gesturing a win ❤️
The kid has no clue what her dad has done today but someday she'll be proud ☺️#INDvSA pic.twitter.com/j6QVlA28OJ
— Vinesh Prabhu (@vlp1994) December 30, 2021
https://twitter.com/KohlifiedGal/status/1476494454303322112?s=20
हेही वाचा- बाबा विराटला चीयर करण्यासाठी पहिल्यांदाच वामिका स्टेडियममध्ये, आई अनुष्कासोबत कॅमेरात कैद
दरम्यान, कर्णधाराच्या रूपात विराटसाठी हा विजय खूपच महत्वाचा आहे. सेंचुरियनमधील मैदानावार भारतीय संघाने कसोटी सामन्यात मिळवलेला हा पहिला विजय ठरला आहे, ज्यात विराटने संघाचे नेतृत्व केले. परंतु विराट फलंदाजाच्या रूपात अपयशी ठरला. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात ३५, तर दुसऱ्या डावात अवघ्या १८ धावा केल्या.
तत्पूर्वी, विराटने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने चांगले प्रदर्शन केले. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावा केल्या, यामध्ये केएल राहुलच्या (१२३) शतकी खेळीचा समावेश होता. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिका संघ अवघ्या १९७ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या १७४ धावांवर सर्वबाद झाला. यामध्ये भारताचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या डावात ३०५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संघ पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आणि भारताने विजय मिळवला. दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या डावात १९१ धावा केल्या आणि भारताने ११३ धावांनी मोठा विजय नोंदवला. केएल राहुलला त्याच्या महत्वपूर्ण योगदानासाठी सामनावीर निवडले गेले.
महत्वाच्या बातम्या –
सेंच्यूरियन कसोटी फत्ते करत आशियाच नव्हे आशियाबाहेरही चमकली विराटसेना, केला ‘हा’ शानदार किर्तीमान
फ्लॅशबॅक २०२१: क्रिकेट विश्वात वर्षभरात उफाळलेल्या ‘या’ ५ वादांची झाली सर्वाधिक चर्चा
बाबा विराटला चीयर करण्यासाठी पहिल्यांदाच वामिका स्टेडियममध्ये, आई अनुष्कासोबत कॅमेरात कैद
व्हिडिओ पाहा –