घरेलू क्रिकेट खेळणाऱ्या गुजरातच्या 30 वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आपल्या शानदार गोलंदाजीने आयपीएल 2021 मध्ये आपला ठसा उमटविला आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चेंलेंजर्स बेंगळुरू या संघामध्ये खेळत असून आत्तापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या चारही सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले आहे. तसेच या सत्रात त्याने आतापर्यंत सर्वाधिक बळी घेतले आहेत. नुकताच गुरूवारी (22 एप्रिल) खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातील त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात नाणेफेक हारून राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी करीता आला. परंतु या सामन्यात राजस्थानची सुरूवात खूप खराब झाली. त्यामध्ये राजस्थानचा फलंदाज रियान पराग फलंदाजी करत असताना 14 व्या षटकात हर्षल पटेल गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर परागने हेलिकॉप्टर शॉट मारत चौकार किंवा षटकार खेचण्याचा प्रयत्न केला.
परंतु सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या युझवेंद्र चहलने झेलद्वारे परागला बाद केले. जेव्हा पराग बाद झाला तेव्हा हर्षलने त्याला रागात तंबूत परतण्याचा इशारा केला. त्याने केलेल्या या इशाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1385252151023181827?s=20
https://twitter.com/samayada_abhava/status/1385250757155299333?s=20
https://twitter.com/ag_naz/status/1385250660711428105?s=20
https://twitter.com/SankarMahhaRajh/status/1385248626666995713?s=20
https://twitter.com/atombigg_cric/status/1385250829733564416?s=20
या सामन्याबाबत सांगायचे झाले तर, या सामन्यात राजस्थानचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस आला होता. परंतु त्यांच्या संघातील प्रमुख फलंदाजांना चांगली कामगिरी अपयश आले. त्यानंतर अष्टपैलू शिवम दुबेच्या 46 धावा आणि राहुल तेवतियाच्या 40 धावांच्या खेळीवर राजस्थानने 20 षटकांत 9 गडी गमावून 177 धावा केल्या. तर बंगळुरूकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीकरीता उतरलेल्या आरसीबी संघातील सलामीवीर देवदत्त पड्डीकल आणि विराट कोहलीने शानदार सुरुवात करून एकही गडी न गमावता डावातील 17 व्या षटकांत संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझे शतक नव्हे संघाचा विजय महत्त्वाचा,’ सामनावीर पडीक्कलच्या वक्तव्याने जिंकली सर्वांचे मने
जेंटलमन्स गेम! लाईव्ह सामन्यात जोस बटलरचं मनाला भावणारं कृत्य, एकदा व्हिडिओ पाहाच
आरसीबीचा विजयी ‘चौकार’, रोहित-गंभीरला न जमलेलं कोहलीने करुन दाखवलं






