इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात राजस्थान रॉयल्स तब्बल १४ वर्षांच्या काळानंतर अंतिम सामन्यात पोहोचला. कर्धणार संजू सॅमसन याने संघासाठी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ म्हणावे लागेल. भारताचा युवा खेळाडूंचा संघ सध्या आयर्लंड दौऱ्याच्या तयारीत आहे आणि यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनला या दौऱ्यासाठी संधी दिली गेली आहे. सॅमसनसाठी हा दौरा महत्वाचा असल्यामुळे तो नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे.
आयर्लंडविरुद्ध भारताला २ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी निवडकर्त्यांवर प्रभाव टाकण्यासाठी सॅमसनकडे ही शेवटची संधी असू शकते. दौऱ्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत संजू सॅमसन (Sanju Samson) त्रिवेंद्रममध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. तो दररोज तीन ते चार तास घाम गाळत असल्याची माहिती आहे. आयर्लंडमधील खेळपट्टीवर गोलंदाजांना अतिरिक्त गती आणि बाउंस मिळत असतो, त्यामुळे सॅमसन स्पेशल-थ्रोडाउनच्या माध्यमातून फलंदाजी करताना दिसला.
Sanju Samson preparations ahead of Ireland T20I series#INDvIRE #IREvIND pic.twitter.com/uXJjPBvKPm
— Cricket Mirror (@Cricket_Mirror_) June 20, 2022
२७ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनला चांगले माहीत आहे की, आयर्लंड दौरा त्याच्यासठी एक वरदान ठरू शकतो. जर आयर्लंडमध्ये त्याने मोठी धावसंख्या उभी केली, तर तो टी-२० विश्वचषकात संधी मिळण्यासाठी दावेदारी ठोकू शकतो. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. नियमित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे सॅमसनला आयर्लंड दौऱ्यासाठी संघात सहभागी केले गेले आहे.
टी-२० विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात जागा मिळवायची असल्यास सॅमसनपुढे फक्त पंत नाही, तर इतर खेळाडूंचे देखील आव्हान आहे. यामध्ये इशान किशन आणि दिनेश कार्तिकचा समावेश करावा लागेल. आयपीएल २०२२ मधून कार्तिकने जोरदार पुनरागमने केले होते आणि तो सध्या भारतीय संघासाठी खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत कार्तिकचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. तसेच इशान किशनने देखील आफ्रिकी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आणि विश्वचषकाच्या संघात जागा मिळण्यासाठी दावेदारी सिद्ध केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फलंदाजी नव्हे तर स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करतोय पुजारा, अजिंक्य रहाणे आहे कारण
‘इशान किशनला खेळात आणखी सुधारणा करता येतील’, भारतीय दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला
‘इशान किशनला खेळात आणखी सुधारणा करता येतील’, भारतीय दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला