मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले होते. संघातील वरिष्ठ खेळाडूंना देखील चांगले प्रदर्शन करता आले नसल्यामुळे भारत सुपर१२च्या पुढच्या फेरीत जाऊ शकला नाही. यावर्षी देखील टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे, पण संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
आगामी टी-२० विश्वचषकात भारतीय संघ चांगले प्रदर्शन करू इच्छित आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील याच उद्देशाने संघ तयार करत आहे. विश्वचषकाच्या आधी होणाऱ्या सामन्यांवर सर्वांच्या नजरा आहे. या सामन्यांतील खेळाडूंचे प्रदर्शन पाहूनच पुढे विश्वचषकासाठी संघ निश्चित केला जाईल. असे अनेक युवा खेळाडू आहेत, जे विश्वचषकाच्या संघात फिट बसू शकतात.
दुसरीकडे विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूचा फॉर्म संघासाठी एक चिंतेची बाब आहे. मागच्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून विराट धावा करण्यासाठी झगडत आहे. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे शतक केले होते. तेव्हापासून विराटला दुसरे शतक देखील करता आले नाही. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२ मध्येही विराट पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहिले गेले.
सध्या रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांसह भारताच्या वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका भारतीय संघ खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध खेळले जाणारे सर्व सामने भारतासाठी महत्वाचे आहेत. या मालिका एकप्रकारे संघासाठी विश्वचषकाची तयारी मानल्या जात आहेत. विराट आणि रोहितसारखे दिग्गज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत आणि संघ व्यवस्थापनासाठी ही एक चिंतेची बाब आहे.
जर विराट इंग्लंड दौऱ्यात देखील अपयशी ठरला, तर निवडकर्त्यांना विश्वचषकासाठी युवा खेळाडूंचा विचार करावा लागू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारताच्या युवा खेळाडूंचा संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्या याच्यावर सोपवली आहे.
राहुल त्रिपाठीला या मालिकेसाठी पहिल्यांदाच भारतीय संघात निवडले गेले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत इशान किशन एकमेव फलंदाज ठरला ज्याने २०० धावांचा टप्पा पार केला. यावर्षी आयपीएलमध्ये चांगले फ्रदर्शन करणाऱ्या दीपक हुड्डाच्या नावावर देखील भविष्यात विचार केला जाऊ शकतो. युवा खेळाडूंच्या खेळीत झालेली सुधारणा पाहता विराटप्रमाणेच दुसऱ्या वरिष्ठ खेळाडूंवर देखील दबाव वाढत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लज्जास्पद..! सेल्फी घ्यायला आलेल्या ग्राउंड्समनला ऋतुराजची अपमानकारक वागणूक, हाताने दिला धक्का
‘सिक्सर किंग’ युवराजने मुलाचे ठेवले हटके नाव, चाहत्यांना दाखवली लाडक्याची झलक; पाहा गोंडस PHOTO





