मागच्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनले आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे प्रत्येक संघ सामना जिंकण्यासाठी खेळत आहे. यादरम्यानच्या काळात खेळपट्टीप फलंदाजांसाठी अधिक अवघड बनल्याचेही आपण पाहिले आहे. भारतीय संघाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा यालादेखील असेच वाटते. पुजाराच्या मते प्रत्येक संघाला विजय हवा असल्यामुळे फलंदाजीसाठी अवघड खेळपट्टी बनवली जात आहे.
पूर्वी कसोटी क्रिकेट संथ गतीच्या फलंदाजीसाठी ओळखले जायचे, पण अलिकडच्या काही वर्षांमध्ये या स्पर्धेत आक्रमक खेळी होताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात नुकतेच इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी पहिल्याच दिवशी शतक ठोकले. फलंदाज टी-20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) म्हणाला, “जागतिक कसोटी अजिंक्यपदामुळे फक्त भारतातच नाही तर प्रत्येक देशात खेळपट्टी अवघड बनवली जात आहे. अशात मागच्या 4-5 वर्षीत कसोटी क्रिकेट फलंदाजांसाठी सोपे राहिले नाही, यात शंकाच नाही. पण एका फलंदाजाच्या रूपात नेहमी प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही तयार असला पाहिजे.”
चेतेश्वर पुजारा 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी पुजारा पूर्णपणे तयार दिसत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी विचारल्यानंतर पुजारा म्हणाला, “या मालिकेविषयी खूप चर्चा सुरू आहे. कांगारू (ऑस्ट्रेलिया) संघ खूप भक्कम आहे आणि मला त्यांच्याविरुद्ध चांगले प्रदर्शन करायला आवडते. त्यांना शांत करण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात चांगली खेळी करून दाखवा.”
पुजाराने भारतीय संघासाठी आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये तो कारकिर्दीतील 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करेल. याविषयी पुजारा म्हणाला, “हा माझ्यासाठी खास विक्रम आहे. पण एका क्रिकेटपटूच्या रूपात तुम्हाला प्रत्येक सामन्यात काही ना काही शिकायला मिळते. मा अजूनही हेच करण्याच्या प्रयत्न करत आहे.” पुजाराने 98 कसोटी सामन्यांमध्ये 7014 धावा केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्याने भारतासाठी 5 वनडे सामनेही खेळले आहेत, ज्यात 51 धावांचे योगदान देऊ शकला. भारत आणि ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना 9 तारखेला नागपूरच्या विदर्श क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू होईल. (Ahead of the Border Gavaskar Trophy, Cheteshwar Pujara revealed the way to face the Australian team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानमध्ये स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट, बाबर आझम आणि शाहिद आफ्रिदीच्या सुरक्षेसाठी थांबवला सामना
तब्बल 5 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करताच ‘जड्डू’चा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सर्जरी केली नसती तरी…’






