भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमवर खेळला जाणार आहे. 9 मार्च रोजी सुरू होणाऱ्या या सामन्यातवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर असला, तर हा शेवटचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. मात्र या सामन्यासाठी भारतीय संघात एकापेक्षा अधिक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने इंदोर कसोटी नावावर केल्यावर स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी जागाही पक्की केली होती. तसेच या सामन्यातील विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी देखील जाईल. मात्र, यासाठी भारतीय संघ काही टोकाचे निर्णय घेऊ शकतो.
भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आपल्या संघात एक बदल केला होता. सूर्यकुमार यादव याच्या जागी श्रेयस अय्यर याला संधी देण्यात आलेली. तर, तिसऱ्या सामन्यात मोहम्मद शमी याला विश्रांती देत उमेश यादवला अंतिम अकरामध्ये निवडले गेलेले. तसेच, खरा फॉर्ममधील के एल राहुल याच्या जागी शुबमन गिल संघाचा भाग बनलेला. मात्र, तिसरा सामना गमावल्यानंतर भारतीय संघ दोन बदल करू शकतो. या मालिकेत सपशेल अपयशी ठरलेला यष्टीरक्षक केएल भरत याच्या जागी इशान किशन हा पदार्पण करू शकतो. तसेच, मोहम्मद सिराज याला बाहेर करत मोहम्मद शमी याला पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव.
(Ahmedabad Test Ishan Kishan Likely Make His Test Debute Shami Also Making Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, ‘मी केस दोन वेळा…’
‘बाबा, तुम्ही चांगलं केलंय…’, सर विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी लेक मसाबाची पोस्ट तुफान व्हायरल