पुणे (23 मार्च 2024) – आज प्रमोशन फेरीतील संघाचे पाच सामने पूर्ण झाले. अजून प्रत्येकी 2 सामने शिल्लक असून गुणतालिकेत उलटफेर होऊ शकतात. सध्याच्या घडीला अहमदनगर संघ पहिल्या क्रमांकावर सुरक्षित आहे. तर पाठोपाठ कोल्हापूर संघ आहे. आज झालेल्या लढतीत अहमदनगर व कोल्हापूर संघानी प्रमोशन फेरीतील पाचवा विजय मिळवला. तर मुंबई शहर ने प्रमोशन फेरीत पहिला विजय मिळवत गुणतालिकेत खात उघडला.
आज झालेल्या पहिल्या लढतीत मुंबई शहर ने 36-22 असा बीड संघावर मात देत प्रमोशन फेरीतील पहिला विजय संपादन केला. मुंबई शहर कडून चढाईत जतिन विंदे तर बचावात रुपेश साळुंखे हे विजयाचे शिल्पकार ठरले. बीड संघाचा हा सलग पाचवा पराभव ठरला. तर आज झालेल्या दुसऱ्या लढतीत अहमदनगर संघाने रत्नागिरी संघाचा 52-25 असा धुव्वा उडवला. प्रफुल झावरे ने अष्टपैलू खेळ करत 16 गुण मिळवले. तर संकेत खलाटे ने पकडीत एकूण 4 गुण प्राप्त केले. शिवम पठारे व आशिष यादव यांनी सुद्धा अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.
आज तिसरा सामना नंदुरबार विरुद्ध पालघर यांच्यात झाला. नंदुरबार संघाने 44-30 असा पालघर संघावर विजय मिळवला. नंदुरबार कडून वरून खंडले ची अष्टपैलू खेळी महत्वपूर्ण ठरली. तर जयेश महाजन व इतर चढाईपटूंनी उत्कृष्ट खेळ करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. पालघर कडून प्रतिक जाधव ने एकाकी झुंज दिली. आजच्या शेवटच्या सामन्यात कोल्हापूर संघाने 47-32 असा सांगली संघावर विजय मिळवला. साहिल पाटील व सौरभ फगारे विजयाचे शिल्पकार ठरले. (Ahmednagar and Kolhapur team’s position in the top 2 in the promotion round is almost certain)
प्रमोशन फेरी गुणतालिका.
1. अहमदनगर – 30 गुण (5 सामने)
2. कोल्हापूर – 27 गुण (5 सामने)
3. पालघर – 19 गुण (5 सामने)
4. नंदुरबार – 13 गुण (5 सामने)
5. रत्नागिरी – 13 गुण (5 सामने)
6. सांगली – 11 गुण (5 सामने)
7. मुंबई शहर – 6 गुण (5 सामने)
8. बीड – 1 गुण (5 सामने)
महत्वाच्या बातम्या –
हर्षित राणाचा जलवा! अनुभवी मयंक अगरवालची विकेट घेतल्यानंतर दिला फ्लइंग किस । VIDEO
गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान! पाहा दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी