तंत्रज्ञान अनेकदा माणसाच्या मदतीसाठी उपयोगी येते. खेळात तंत्रज्ञान आल्याने त्याचा फायदाच अधिक झाला आहे. पण काहीवेळेस याच तंत्रज्ञानामुळे मजेशीर घटनाही घडतात. अशीच एक घटना स्कॉटलंडमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान घडली. सामन्यात आर्टिफिशियल इंटेलिजंस कॅमेरा फुटबॉल म्हणून लाईन्समनचे टक्कल दाखवत होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
झाले असे की स्कॉटलंडमध्ये कोव्हिड-19 च्या कारणामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाही, तसेच कॅमेरामनच्या ऐवजी कृत्रिम कॅमेरा (आर्टिफिशियल इंटेलिजंस) वापरला जात आहे. यावेळी इव्हर्नेस आणि एवायआर युनायटेड यांच्यातील सामन्यादरम्यान या कृत्रिम कॅमेराला टक्कल आणि फुटबॉल यांच्यात फरक करता आला नाही. त्यामुळे हा कॅमेरा सातत्याने लाईन्समनचा टक्कलच दाखवत होता.
यामुळे चाहत्यांना हा सामना नीट पाहाताच आला नाही. त्यांना फुटबॉल दिसण्याऐवजी सातत्याने लाईन्समनच दिसत होता. त्यामुळे अनेकांनी याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=9zoJP2FkpgU
Inverness Caledonian Thistle don’t employ a cameraman as their camera is programmed to follow the ball throughout the match. The commentator had to apologise today as the camera kept on mistaking the ball for the linesman’s head… pic.twitter.com/LeKsc2bEj7
— Tom Cox (@seagull81) October 24, 2020
हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
महत्त्वाच्या बातम्या –
मेस्सीच्या बार्सिलोना संघाच्या थरारक प्रदर्शनामुळे रोनाल्डोचा संघ चितपट, २ वर्षांनंतर घडलं ‘असं’
EPL: सोन-केनच्या जोडीची जबरा कामगिरी; नोंदवला हंगामातील नववा गोल
दिग्गज फुटबॉलपटूला कोरोनाची लागण; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती