केपटाऊन कसोटीत वेगवान गोलंदाजांनी अक्षरशः कहर घातल्याचे दिसले. पण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामी फलंदाज ऍडेन मार्करम याने संयमी आणि सुरेख खेळी केली. मार्करमने गुरुवारी (4 जानेवारी) या सामन्यात कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. आफ्रिकी संघाचे फलंदाज एकापाठोपाठ विकेट्स गमावत असताना मार्करम याने विकेट सोडली नाही.
केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या दोन्ही संघांचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. भारतासाठी मोहम्मद सिराज याने पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या. तेसच मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेत यजमानांनी अवघ्या 55 धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात भारतीय संघाच्या एकूण सहा खेळाडूंनी शुन्यावर विकेट गमावल्या. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघ 153 धावांवर गुंडाळला गेला.
दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर त्यांचे फलंदाज नियमित अंतरावर बाद होत राहिले. पण सलामीवीर फलंदाज ऍडेन मार्करम (Aiden Markram) याने विकेट सोडली नाही. त्याने 99 चेंडूत आपले सातवे कसोटी शतक पूर्ण केले. एकूण 103 चेंडू खेळल्यानंतर 106 धावांवरत्याने मोहम्मद सिराजला आपली विकेट दिली. कर्णधार रोहित शर्मा याच्या हातात मार्करम झेलबाद झाला. मार्करमची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचे बोलले जात आहे.
A RE-MARKA-BLE century for Aiden Markram 💯
Against all odds he has produced a beauty of an innings 🏏🇿🇦
His first 💯 against India.What a marvel to watch 😍#WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/vFI1MzRAQb
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 4, 2024
दरम्यान, दक्षिण आप्रिकेचा दिग्गज फलंदाज डीन एल्गर याच्यासाठी केपटाऊमधील हा कसोटी सामना कारकिर्दीतील शेवटचा आहे. पण आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात एल्गरला समाधानकारक खेळी करता आली नाही. त्याने पहिल्या डावात 4, तर दुसऱ्या डावात 12 धावा करून विकेट गमावली. असे असले तरी, एल्गरसोबत डावाची सुरुवात करायला आलेल्या मार्करमने दुसऱ्या डावात शतक ठोकले आणि निरोपाच्या सामन्यात त्याला ट्रिब्यूट दिला. (Aiden Markram scored a century in the Cape Town Test against India )
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), ऍडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy; आदित्य ठाकरे विदर्भाकडून खेळणार रणजी सामने, पाहा विदर्भाचा 16 सदस्यीय संघ
IND vs SA: टीम इंडिया 153 धावांवर ऑलआऊट झाल्याने माजी दिग्गज खवळला, म्हणाला, ‘केएल राहुलमुळे…’