भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याची प्रसिद्धी संपुर्ण जगभरात आहे. धोनी संबंधित कोणताही व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी धोनी चेन्नईला गेला होता. चेन्नईमधील चाहत्यांनी त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले होते. या प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता धोनीचा आजून एक व्हिडीआो व्हायरल होत आहे. धोनीच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
एमएस धोनी (M.S. Dhoni) विमानातून प्रवास करत असताना तो झोपला होता. धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी देखील या व्हिडीओमध्ये दिसली. धोनी झोपलेला असताना विमानातील एका हवाईसुंदरीने हा व्हिडीओ काढला आहे. सोबतच तिने धोनीला पाहून झालेला तिचा आनंद दाखवला आहे. तीने हा व्हिडीयो आपल्या सोशल मीडियावर शेआर केला. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होताच धोनीचे अनेक चाहते संतापल्याचे दिसते. व्हिडिओवर धोनीचे चाहते आपल्या प्रतीक्रिया देत आहेत. धोनीच्या एका फॅनपेजने आपल्या ट्विटर अकांऊटवर हा व्हिडीओ शेअर केला.
https://twitter.com/ChakriDhoni17/status/1685171068909375488?s=20
धोनीच्या चाहत्यांच म्हणन आहे की, हा व्हिडीओ धोनीचा खाजगी जिवनाचा भाग आहे. या व्हिडीओमधून धोनीच खाजगी जिवन लोकांसमोर आनण्याचा कोणालाही हक्क नाही. चाहत्यांकडून हवाईसुंदरीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तसेच तिला कामावरुन कमी करण्याची मागणीही केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच धोनीचा विमानातील एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात धोनीची एक हवाईसुंदरी त्याला चॉकलेट देताना दिसली. धोनी या व्हिडीओत आपल्या मोबाईलवर कँडी क्रश गेम खेळताना दिसला होता. या व्हिडीओत धोनी स्वता आंनदी दिसला होता. यामुळे धोनीच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला होता. परंतू आता हा व्हिडीओ धोनीच्या खाजगी जिवनाचा भाग आहे. असे मत चाहते मांडत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
वेस्ट इंडिजहून परतताच अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धेतून माघारी घेतले नाव
‘हा’ संघ बनला Zim Afro T10चा पहिला-वहिला चॅम्पियन, 56 चेंडूत युसूफ पठाणच्या संघाचा खेळ खल्लास






