---Advertisement---

श्रीलंकेचा ‘मिस्ट्री स्पिनर’ अजंता मेंडीसची क्रिकेटमधून निवृत्ती

On: गुरूवार, ऑगस्ट 29, 2019 10:57 AM
---Advertisement---

श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखले गेलेला अजंता मेंडीसने बुधवारी(28 ऑगस्ट) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2008 ला वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे सामन्यातून पदार्पण केलेल्या मेंडीसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 288 विकेट्स घेतल्या आहेत.

मेंडीस त्याच्या कॅरम बॉलसाठी ओळखला जात होता. त्याने श्रीलंकेकडून 19 कसोटीत 70 विकेट्स, 87 वनडेत 152 विकेट्स आणि 39 टी20 सामन्यात 66 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड विरुद्ध ख्राईस्टचर्च येथे खेळला.

मेंडीसच्या नावावर वनडेमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्याने 19 सामन्यात हा पराक्रम केला होता. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोन वेळा 6 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

त्याने 2008 च्या एशिया कपमध्ये अंतिम सामन्यात भारताविरुद्ध 13 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेने 100 विकेट्सने त्या सामन्यात विजय मिळवला होता. या कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो प्रकाशझोतात आला होता. त्याला त्याचवर्षी भारताविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

‘या’ सामन्यासाठी टिम पेन नाही तर हा खेळाडू करणार ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व

दिनेश कार्तिक करणार ‘या’ संघाचे नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment