---Advertisement---

दिनेश कार्तिक करणार ‘या’ संघाचे नेतृत्व

---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला सोमवारी तमिळनाडू क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तो 24 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान जयपूरमध्ये होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडूचे नेतृत्व करेल.

ही घोषणा तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या निवड समीतीने केली आहे. निवड समीतीचे अध्यक्ष एम सेन्थीलनाथन यांनी पीटीआयला सांगितले की ‘कार्तिकची त्याचा अनुभव पाहून आणि त्याच्यातील नेतृत्वगुण पाहुन कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

‘त्याने विविध स्तरावर नेतृत्व केले आहे. यामध्ये आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे.’

आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकताने 2018मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र 2019 च्या आयपीएलमध्ये त्यांना 5 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तसेच कार्तिकला 2019 विश्वचषकासाठीही भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र त्याला खास कामगिरी करता आली नाही. यानंतर त्याची विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेली नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी टीव्ही जाहिरांतीची मदत घेत आहेत जम्मू-कश्मीर क्रिकेट बोर्ड

६० वर्षांची कारकिर्द, ७००० विकेट्स! ८५ व्या वर्षी या क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे विंडीजचा संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment