Loading...

खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी टीव्ही जाहिरांतीची मदत घेत आहेत जम्मू-कश्मीर क्रिकेट बोर्ड

जम्मू आणि काश्मिर क्रिकेट असोसिशनने(जेकेसीए) आपल्या क्रिकेटपटूंशी संपर्क साधण्यासाठी टीव्ही जाहिरातींची मदत घेतली आहे. या जाहिराती स्थानिक चॅनल्सवर देत असून यात 31 ऑगस्टपर्यंत क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट मोसमाच्या तयारीसाठी एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंशी जम्मू आणि काश्मिर क्रिकेट असोसिशनचा संपर्क झालेला नाही. यामध्ये जम्मू आणि काश्मिर संघाचा कर्णधार परवेझ रसुलचाही समावेश आहे.

याबद्दल इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जेकेसीएचे सीइओ साह बुखारी यांनी माहिती दिली आहे की ‘जम्मू आणि काश्मिरमध्ये सध्या गुलीस्तान आणि इटीव्ही हे दोन चॅनेल्स सुरु आहेत. आम्ही आधी वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा विचार केला होता.’

‘पण आम्हाला माहित नाही की काश्मिरमधील लोकांपर्यंत ते पोहचेल की नाही. त्यामुळे आम्ही विचार केला की टीव्ही जाहीराती हे खेळाडूंपर्यंत पोहचण्याचे चांगले माध्यम आहे.’

तसेच जम्मू आणि काश्मिर संघाचा मार्गदर्शक आणि प्रशिक्षक इरफान पठाण म्हणाला, ‘असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याशी असोसिएशनचा 3 आठवड्यांपासून संपर्क झालेला नाही.’

Loading...

मी मागील आठवड्यात शेवटचे परवेझशी बोललो होतो, तो जेव्हा जम्मूमध्ये आला होता. त्याने मला संपर्क केला होता आणि तो ट्रेनिंगसाठी जम्मूमध्ये आला होता. पण त्यावेळी क्रिकेटची कोणतीही प्रक्रिया चालू नसल्याने तो पून्हा काश्मिरला गेला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क झालेला नाही.’

‘आम्ही लोकांना त्यांच्या घरी पाठवण्याचा विचार केला होता. पण हे संभव नसल्याने तो निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे टीव्ही जाहिराती हे योग्य माध्यम आहे.’

याबरोबरच इरफान म्हणाला, खेळाडू कॅम्पसाठी एकत्र आल्यानंतर जेकेसीए त्यांच्या राहण्याची आणि अन्य सुविधांची काळजी घेईल.

तसेच भारताकडून 29 कसोटी आणि 120 वनडे सामने खेळलेला इरफान म्हणाला, ‘खेळाडूंना पहिले येऊ द्या. आम्हाला याची स्पष्टता नाही की टीव्हीवर आमची जाहिरात पाहून कोणकोण येणार आहे. मला आशा आहे की सर्वजण येतील.’

तसेच तो म्हणाला,या संदर्भात आम्ही बीसीसीआय किंवा कॉर्पोरेट्सशी संपर्क साधू. ज्यामुळे कदाचीत खेळाडू दुसऱ्या राज्यात तयारी करु शकतील.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

६० वर्षांची कारकिर्द, ७००० विकेट्स! ८५ व्या वर्षी या क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

Loading...

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे विंडीजचा संघ

वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

You might also like
Loading...