नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड (INDvNZ) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा फिरकीपटू एजाज पटेलने एका डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. (Azaj Patel Took 10 Wickets In An Inning) असा कारनामा करणारा तो तिसराच गोलंदाज ठरला. परंतु अनेकांना माहीत नसेल की, फिरकीच्या तालावर भारतीय गोलंदाजांना अडचणीत टाकणारा एजाज आधी वेगवान गोलंदाज होता. मात्र, त्यानंतर त्याने फिरकी गोलंदाज होण्याचा निर्णय घेतला होता. यामागील कारणाचा खुलासा त्याने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रविचंद्रन अश्विनने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसून येत आहे. त्याने म्हटले की, “हा माझ्या आयुष्यातील एक खास क्षण होता. वानखेडे स्टेडियमवर खेळणे आणि अशी कामगिरी करणे हे माझे स्वप्न होते. हे माझ्यासह माझ्या कुटुंबासाठी देखील खास आहे.”
तसेच वेगवान गोलंदाजी सोडून फिरकीपटू होण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर एजाज म्हणाला, “माझी उंची एका वेगवान गोलंदाजाइतकी नाहीये. त्यामुळे जवळपास १० वर्षांपूर्वी मी फिरकी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य निर्णय होता. त्यानंतर माझा प्रवास सुखद होता. मी खूप मेहनत घेतली कारण ही कला अवगत होण्यासाठी खूप वेळ लागतो.”
एजाज एका डावात १० गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० ने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ कसोटी संघांच्या यादीत पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. येत्या २६ डिसेंबर पासून भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होईल. (India Tour Of South Africa)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघाचा दिलदारपणा! कानपूर कसोटीनंतर आता वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनाही दिले मोठे बक्षीस
अश्विनने सांगितलं आणि एजाजचं अनेक १० वर्ष रखडलेलं काम झटक्यात झालं
फक्त एजाज-रचिनच नव्हे, तर ‘या’ ४ भारतीय वंशाच्या क्रिकेटर्सने टीम इंडियाला टाकले आहे अडचणीत