भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान न्यूझीलंड संघात असा एक फिरकी गोलंदाज आहे, जो या मालिकेत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. इतकेच नव्हे तर या गोलंदाजाचे भारताशी खास नाते देखील आहे.
कानपूरच्या मैदानाचा इतिहास पाहिला, तर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत असते. त्यामुळे न्यूझीलंड संघात डाव्या हाताचा फिरकीपटू एजाज पटेलला संधी दिली जाऊ शकते. ३३ वर्षीय एजाज पटेलचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. त्यानंतर वयाच्या ८ व्या वर्षी तो आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडला गेला होता.
याबाबत बोलताना एजाज पटेल म्हणाला की, “मी भारताच्या त्या भागात आहे, जे मी कधीच पाहिले नाहीये. भारत खरच खूप अद्भुत आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता आम्ही बाहेर जाऊन त्याचा आनंद घेऊ शकत नाहीये. इथे घाई – गडबड सुरू असली, तरी देखील एक शांतता असते.”
तसेच भारतीय खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याबाबत एजाज पटेल म्हणाला की, “आम्हाला माहीत आहे की, एक फिरकी गोलंदाज म्हणून या खेळपट्टीवर काय करायचं आहे. परंतु, फिरकी गोलंदाजासाठी भारतात भारतीय फलंदाजांचा सामना करणे किती कठीण आहे, हे आम्हाला माहीत आहे. हे आव्हानात्मक आहे, पण मी त्याबद्दल उत्साहित आहे.”
या मालिकेतील पहिला सामना २५ -२९ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार आहे, तर दुसरा सामना ३-७ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे. न्यूझीलंड संघाला १९८८ नंतर भारतात एकही कसोटी सामना जिंकण्यात यश आले नाहीये. त्यामुळे न्यूझीलंड संघ जोरदार कामगिरी करून हा विक्रम मोडून काढण्याच्या प्रयत्नात असणार आहे. न्यूझीलंड संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करत जेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध कानपूर कसोटीत मोठी खेळी केली, तर केन विलियम्सन ‘या’ तीन दिग्गजांना टाकू शकतो मागे
भारतीय संघात ‘या’ तिघांचे स्थान सर्वात मजबूत, २०२३ विश्वचषकापर्यंत संघाबाहेर होण्याची शक्यता कमीच






