---Advertisement---

एजाज म्हणतोय, “तेव्हा मला वाटले विश्वविक्रम होऊ शकतो””

On: गुरूवार, डिसेंबर 9, 2021 8:27 AM
Azaj-Patel
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड ( india vs new zealand test series ) यांच्यात नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. भारताने या मालिकेत १-० असा विजय मिळवला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघासाठी खेळणारा भारतीय वंशाचा फिरकीपटू एजाज पटेलने ऐतिहासिक कामगिरी केली. एजाजने या सामन्याच्या एका डावात १० विकेट्स घेतल्या. एजाज पटेल ( ajaz patel ) या कामगिरीनंतर जिम लेकर आणि अनिल कुंबळे या दिग्गजांच्या यादीत सामील झाला. त्याचे हे प्रदर्शन पाहून त्याची भविष्यातील कारकीर्द देखील चांगली असेल, असे अनेकांना वाटते. अशात स्वतः एजाजने देखील त्याच्या भविष्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एजाज पटेलचा जन्म मुंबईत झाला असून, नंतर तो न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. आता त्याने भारताविरुद्ध सामन्यात मुंबईच्याच वानखडे स्टेडियमवर खेळताना ही कामगिरी केली आहे. एजाज पटेल या कामगिरीनंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या बदलांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हटला की, “होय, मी एक अद्भुत गोष्ट साध्य केली आहे, पण हा एक नवीन दिवस आहे आणि आता अजून क्रिकेट खेळायचे बाकी आहे. माझ्यासाठी हे मातीशी जोडलेले राहण्याविषयी आहे”

भविष्यातील क्रिकेट कारकिर्दीविषयी एजाजने मोठे विधान केले. तो म्हणाला, “हे प्रत्यक्षात माझ्यावर खूप प्रभाव टाकणार नाही. कारण मला माहिती आहे की, माझ्या कारकिर्दीत अजून खूप काही बाकी आहे. तुम्ही जर माझी कारकीर्द पाहिली, तर मी फक्त ११ सामने खेळले आहेत. मी त्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील होऊ इच्छितो, ज्यांनी न्यूझीलंडसाठी ८०-९० कसोटी सामने खेळले आहेत.”

एका डावात १० विकेट्स घेण्याविषयी तो म्हणाला की, “इमानदारीने सांगायचे तर, नववा विकेट मिळेपर्यंत मी याविषयी विचार करत नव्हतो, कारण माझा स्पेल खूप लांब होता. एका स्पिनरच्या रूपात तुम्ही एका वेळी एका चेंडूवर लक्ष्य केंद्रित करता आणि खूप पुढचा विचार नाही करत. त्यामुळे माझे लक्ष प्रामुख्याने उत्कृष्ट गोलंदाजी टाकण्यावर होते. मला माहिती होते की, जर मी सर्व १० विकेट्स घेतल्या, तर ही एक विशेष उपलब्धि असेल.”

दरम्यान, एजाजने या दुसऱ्या कसोटी सामन्यात एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला असला, तरी न्यूझीलंड संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. पहिल्या डावात एजाजने हा विक्रम केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही आक्रमक भूमिका स्वीकारली आणि न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर सर्वबाद केले. भारताने पहिल्या डावात मिळवलेले आघाडी दुसऱ्या डावातही कायम राखली. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने ३७२ धावांनी विजय मिळवला. तत्पूर्वी, पहिल्या कसोटी सामना न्यूझीलंडने अनिर्णीत केला होता.

महत्वाच्या बातम्या –

ऍशेस: कमिन्सचा पंजा अन् इंग्लंड ऑलआऊट; पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

बाबो! स्पायडरमॅन अन् तोही थेट मैदानात, पाहा लाईव्ह सामन्यादरम्यानचा ‘तो’ भन्नाट व्हिडिओ

भारीच ना!! वामिकाचा वाढदिवस होणार खास; विराट लाडक्या लेकीला देणार खास भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---