कोरोना व्हायरसचा धोका हा संपूर्ण जगासमोरील एक मोठे आव्हान आहे. या व्हायरसमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. याचा फटका क्रिकेट जगतालाही बसला आहे. त्यामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
या व्हायरसला नष्ट करण्यासाठी अनेक खेळाडू लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत. त्याचबरोबर ते आपापल्या परीने होईल ती मदत करत आहेत. आता मदत करणाऱ्यांच्या यादीत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही (Ajinkya Rahane) समावेश झाला आहे.
रहाणेने या व्हायरसविरुद्धच्या (Corona Virus) लढाईत महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये (Maharashtra Chief Minister Relief Fund) १० लाख रुपयांची मदत (Help of 10 Lakh Rupees) केली आहे. रहाणे व्यतिरिक्त अनेक भारतीय खेळाडूंनी कोरोना व्हायरसच्या लढाईत मदत केली आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), एमएस धोनी (MS Dhoni), इरफान पठाण (Irfan Pathan), सुरेश रैना (Suresh Raina) आणि इतर काही खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.
चीनच्या (China) वुहान (Vuhan) शहरापासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरातील ३४००० लोकांचा जीव घेतला आहे. भारतातील २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०३४ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?
-जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार