भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी (23 जून) भारताच्या कसोटी वनडे संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्याकडे जबाबदारी कायम ठेवली आहे. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून पुनरागमन केलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
रहाणे यावर्षी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसला होता. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना त्याने आपले योगदान दिले. त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची देखील त्याला संधी मिळाली. तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असताना त्याने पहिल्या डावात 89 तर दुसऱ्या डावात 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात नियमित सदस्य होऊ शकतो, असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले होते.
रहाणे यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार देखील राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने अद्याप एकही कसोटी सामना गमावलेला नाही. 2020-2021 मध्ये ऑस्ट्रेलियात जाऊन बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो कर्णधार होता.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
बातमी अपडेट होत आहे
(Ajinkya Rahane Again Appointed As Test Team Vice Captain For West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या –
6, 6, 6, 6, 6 । इंग्लिश फलंदाजाची वादळी खेळी, आरसीबी कॅम्पमध्ये आनंदाची लाट
फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजावर आयसीसीकडून बंदी, वाचा वर्ल्ड कप क्वॉलिफायर सामन्यात काय घडलं