भारतात गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात कोरोना व्हायरसने धोक्याची परिसीमा गाठली आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक क्षेत्र अडकली आहेत. यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. नुकताच इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा चौदावा हंगाम अर्ध्यातून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यानंतर भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटू आपापल्या घरी परतताना दिसत आहेत. अशात दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेही घरी परतला आहे.
अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका रहाणेने याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर रहाणे, मुलगी आर्या आणि आपला फोटो शेअर करत तिने रहाणेच्या आगमनाची माहिती दिली आहे. या फोटोत तिघांच्याही चेहऱ्यावर गोड असे हसू दिसत आहे. जणू काही कोरोनाच्या कठीण परिस्थितीत रहाणे सुखरुप घरी आल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे.
या फोटोवर कॅप्शनमध्ये राधिकाने लिहिले आहे की, ‘आर्याचे बाबा घरी आले आहेत.’ यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बाबा घरी आल्याने आर्या किती खुश आहे, हे तिच्या फोटोद्वारे स्पष्ट दिसत आहे, असे एका चाहत्याने म्हटले आहे.
https://twitter.com/RadhikaRahane/status/1390214446035861506?s=20
Nice vahini dada ghari ale khup chan sukhi raha ani safe raha
— Bhagwan Shelar (@Shelar1Bhagwan) May 7, 2021
I can co-relate with this feeling, I see the same happiness on Ahilya's face, when her baba @satyajeettambe comes home after political tours. @ajinkyarahane88
— Dr. Maithili Tambe (@drmaithilitambe) May 6, 2021
घरी रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा. Aarva will get more happiest moments.
— Dinesh🇮🇳🇮🇳🇮🇳 (@dinesh08080808) May 7, 2021
अजिंक्य रहाणेच्या आयपीएल २०२१ मधील कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, या हंगामात त्याला फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यातही तो फक्त ८ धावा करु शकला. तसे तर, रहाणेची आयपीएल कारकिर्दीतील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. परंतु मागील वर्षापासून त्याला माफक संधी मिळत नसल्याचे दिसत आहे.
आयपीएल २०१२ मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले होते. या हंगामात १६ सामने खेळताना त्याने ५६० धावा कुटल्या होत्या. दरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतकेही केली होती. तसेच २०१२-१९ या कालावधीत दर आयपीएल हंगामात त्याने ३०० धावांचा आकडा पार केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कठोर परिश्रमाचे मिळणार फळ! कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी ‘या’ युवा खेळाडूंना मिळणार संधी?
फॉर्म सुधारण्यासाठी भारतातून इंग्लंडला घेतली धाव, तिथेही ठरला अपयशी; आता संघातील स्थान आलं धोक्यात
एक हात मदतीचा! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘विरुष्का’ने लावला हातभार, दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी